ST employees will get uniform cloth stitching expense own akola Sakal
अकोला

Akola News : एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार गणवेशाचा कापड

शिलाईचा खर्च पदरमोड करून : दीड हजार चालक-वाहकांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

Akola News : गेली सहा वर्षे एसटी महामंडळाच्या वाहक, चालकांना स्वतः पदरमोड करून गणवेश शिवावा लागला होता. यावेळीही शिलाई देण्यास महामंडळ प्रशासनाने टाळाटाळ केल्याची माहिती आहे. महामंडळाकडून चालक-वाहकांना गणवेशाचा कापड मिळणार आहे. अकोला व वाशिम विभागातील एक हजार ५०३ चालक-वाहकांना गणवेशाचा कापड मिळणार आहे.

एसटी महामंडळात काम करणाऱ्या वाहक आणि चालकांना महामंडळ प्रशासनाकडून गणवेश तसेच शिलाई खर्च दिला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत महामंडळाने चालक व वाहकांना गणवेश दिला नाही. त्यामुळे पगारातूनच कर्मचाऱ्यांना गणवेशाचा खर्च करावा लागत होता.

यंदा महामंडळ प्रशासनाने चालक व वाहकांना गणवेशाचा कापड देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना गणवेश मिळणार आहे. मात्र, शिलाईचा खर्च स्वत: करावा लागणार असल्याने महामंडळाच्या या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांमधून प्रतिक्रिया येत आहेत.

  • वाहक - ७४८

  • चालक - ७५५

शिलाईचा खर्च स्वतः करावा लागणार

एसटी महामंडळातील वाहक-चालकांना गणवेशासाठी कापड आणि शिलाई भक्ता दिला जात होता. यावेळी मात्र केवळ गणवेशाचे कापड महामंडळ प्रशासनाकडून पुरविले जाणार आहे. शिलाईंचा खर्च वाहकांना स्वतःच्या खर्चातून करावा लागेल. महामंडळ प्रशासनाने शिलाई भत्ता देखील द्यावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून होत आहे.

पूवी केलेला खर्चही द्यावा

सहा वर्षांपासून एसटी महामंडळातील वाहक-चालकांना गणवेश दिला जात नाही. या काळात वाहक आणि चालकांनी स्वतः कपडे खोदी करून गणवेश शिवून घेतले. आतापर्यंत गणवेशावर वाहक, चालक यांनी केलेला खर्च एसटी महामंडळ प्रशासनाने द्यावा. तसेच यावेळी केवळ कापड पुरविले जात आहे. पण शिलाई भत्ताही मंजूर करावा, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.

एसटी महामंडळ प्रशासनाकडून वाहक-चालकांना गणवेशाचा कापड दिला जाणार आहे. शिलाईचा खर्च कर्मचाऱ्यांना करावा लागणार आहे. अकोला व वाशिम विभागातील १५०३ चालक-वाहकांना गणवेशाचा कापड मिळणार आहे.

-शुभांगी शिरसाठ, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT