Child marriage esakal
अकोला

अल्पवयीन मुलाचा बालविवाह थांबविला

वाशिम तालुक्यातील धानोरा (खुर्द) येथील घटना

सकाळ वृत्तसेवा

वाशिम - वाशिम तालुक्यातील धानोरा (खुर्द) येथे १० जून रोजी एका १९ वर्षीय अल्पवयीन मुलाचा बालविवाह लावून देण्यात येणार असल्याची गुप्त माहिती चाईल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांक १०९८ वर मिळाली होती. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अलोक अग्रहरी यांनी बाल संरक्षण कक्षाच्या चमूला तात्काळ घटनास्थळी जाऊन बालविवाह थांबविण्याचे निर्देश दिले.

त्यावरुन तालुका संरक्षण अधिकारी बी.बी. धनगर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे क्षेत्रीय कार्यकर्ता रामा वाळले, चाईल्ड लाईनचे समुपदेशक अर्चना वानखेडे, केस वर्कर अविनाश चौधरी, गोपीशंकर आरु, अविनाश सोनुने, शिवांगी गिरी, अनसिंग पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी ओंकार चव्हाण व गजानन चौधरी यांनी धानोरा (खुर्द) गाठले. तेथील ग्राम बाल समिती, सरपंच अशोक खडसे, ग्रामसेविका गंगासागर महाले, अंगणवाडी सेविका सुनिता आढाव, आशा सेविका बेबी मापारी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष माधव मापारी, ग्रामपंचायत सदस्य भिकाजी इंगोले यांच्यासोबत चर्चा करुन बाल विवाह होत असलेल्या घरी जाऊन वधु/वराचे समुपदेशन करुन बालविवाह रोखला.

मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होते. परंतू मुलगा हा अल्पवयीन असल्यामुळे नवरदेवाला वेशीवरुन वापस जावे लागले. मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण झाल्यावरच लग्न करणार असल्याचे हमीपत्र नवरदेवाकडून लिहून घेण्यात आले. नागरिकांनी बालविवाहाबाबत सतर्क राहावे. जिल्ह्यात होत असलेल्या बालविवाहासंदर्भात माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णत: गोपनिय ठेवण्यात येते. बालविवाह संदर्भात माहिती तसेच काळजी व संरक्षणाची गरज असणारे ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांना मदत करण्याकरीता चाईल्ड लाईनच्या १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अलोक अग्रहरी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT