strike of revenue employees update akola sakal
अकोला

अकोला : महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चिघळणार

तिसऱ्या दिवशीही सरकारकडून संपाची दखल नाही; मागण्या मान्य होईपर्यंत संप कायम ठेवण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्‍हा महसूल कर्मचारी संघटना व महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने विविध मागण्‍यांसाठी ता. ४ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्‍ये अकोला जिल्‍हा महसूल कर्मचारी संघटना व अकोला जिल्‍हा महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. या संपाचा बुधवारी (ता.६) तिसरा दिवस होता. अद्याप सरकारने संपांची दखल घेतली नाही. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत संप कायम ठेवण्याचा इशारा दोन्ही संघटनांनी दिला आहे.

महसूल संघटनेतील महसूल कर्मचाऱ्यांच्‍या प्रमुख मागण्‍यांकरिता हा संप पुकारला आहे. त्यात राज्‍यातील महसूल विभागात महसूल सहायक पदे मोठ्या प्रमाणात रिक्‍त असून, ही पदे तत्‍काळ भरण्‍यात यावी. अव्‍वल कारकून/मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्‍नतीचे प्रस्‍ताव मंत्रालयात दीड ते दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासन निर्णय महसूल व वन विभाग ता. १० मे २०२१ अन्‍वये नायब तहसीलदार संवर्ग हा राज्‍यस्‍तरीय सवर्ग म्‍हणून घोषित करण्‍यात आलेला आहे. त्‍यानुसार सर्व अव्‍वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्‍या सेवा ज्येष्‍ठता याद्या राज्‍यस्‍तरावर एकत्रित करण्‍याबाबत शासनाने पत्र काढलेले आहे. परंतु अव्‍वल कारकून/मंडळ अधिकारी हा जिल्‍हास्‍तरीय संवर्ग असल्‍यामुळे त्‍यांच्‍या याद्या राज्‍यस्‍तरावर एकत्रित करण्‍याची प्रक्रिया ही अन्‍यायकारक असल्‍याने सदर पत्र तत्‍काळ रद्द करावे.

अनुकंपा नोकरभरती करावी. ता. १४ जानेवारी २०१६ रोजीचे शासन निर्णयानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्‍या पदोन्‍नती २५ टक्‍के वरून ५० टक्‍के करण्‍यात आली; परंतु महाराष्‍ट्रात पदोन्‍नती ९० टक्‍के दिली गेली. त्‍यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे निरसित करू नये. कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणी पदोन्‍नतीमध्‍ये कोटा ४० टक्‍के केला. पण महाराष्‍ट्रात बऱ्याच जिल्‍ह्यामध्‍ये पदोन्‍नती दिली गेली नाही. ती त्‍वरीत मिळावी. शिपाई/लिपीक/तलाठी यांची शैक्षणिक अर्हता पदवीधर केली आहे. शिपाई व लिपीकाचे वेतन तलाठी प्रमाणे समान करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. या संपात बुधवारी (ता.६) तिसरा दिवस होता. अद्यापपर्यंत सरकारने मागण्‍यांचा विचार केला नाही. जोपर्यंत मागण्‍या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरू राहील, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

या संपामध्‍ये अकोला महसूल कर्मचारी संघटना अकोला अध्यक्ष वैजनाथ कोरकने, सचिव संतोष कुटे, राज्‍य समन्‍वय समिती उपाध्‍यक्ष राजेंद्र नेरकर, कोषाध्यक्ष सचिन भांबेरे, कार्याध्यक्ष मंगेश पेशवे, नितीन निंबोलकर, संतोष शिंदे, भूषण बोर्डे, आर. एफ. राठोड, संतोष इंगळे, अभय राठोड, संतोष अग्रवाल, प्रशांत देशमुख, पंकज दुबे, शशिकांत फासे, मनोज वाडेकर, राहुल राठोड, गणेश राठोड, मोहन साठे, गणेश ठोंबरे, वर्षा भुजाडे, वनिता मडावी, वंदना वानखडे, संध्या ठाकरे, उमा गावंडे, भाग्यश्री चौधरी, ज्योती नारगुंडी, उज्ज्वला सांगळे, शुभेच्छा पाटील, शिल्पा राऊत, दीपिका केदार, प्रेमा हिवराळे, नीलेश दामोदर, अवी डांगे, शशी देशपांडे, परमेश्वर बोपटे, दीपक बढे, उमेश गावंडे, योगेश खांदवे, संजय तिवारी, प्रमोद घोगरे, दिलीप रुदरकर व समस्त चतुर्थ श्रेणी व अकोला जिल्हा महसूल कर्मचारी संघटना कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GSAT-7R Satellite: भारतीय सैन्याची अंतराळात नवी ताकद! इस्रोकडून सर्वात प्रगत उपग्रह बाहुबली प्रक्षेपित; वैशिष्ट्य काय?

Baba Vanga Prediction : येत्या 60 दिवसांत 4 राशी होणार मालामाल ! बाबा वांगाची भविष्यवाणी उघड

MPSC Success Story: 'राजेश इंदोरे एमपीएससीच्या वर्ग एक परीक्षेत राज्यात ४३ वा': आईच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू, कष्टाच्या जाेरावर यशाल गवसणी

Cow E-attendance: गायींनाही आता ई-अटेंडन्स द्यावा लागणार! एक विशेष मायक्रोचिप विकसित; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi Horoscope Prediction : आजपासून फक्त 24 दिवसांमध्ये बदलणार 'या' राशींचं नशीब ! बक्कळ श्रीमंतीचा योग

SCROLL FOR NEXT