teacher beating to student sakal
अकोला

Murtijapur News : विद्यार्थ्यास मुख्याध्यापकांकडून मारहाण; सिईओंकडे पालकाची तक्रार

मूर्तिजापूर येथील नगर परिषदच्या सेमी इंग्लिश शाळे मध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या शेख अरान व इतर विद्यार्थ्यांमध्ये पावसाच्या छत्री वरून भांडण झाले.

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर - येथील नगर परिषदेच्या स्व. रामदासभैय्या दुबे सेमी इंग्लिश शाळेत शिक्षक प्रदीप झोडपे यांनी त्यांच्या शाळेत इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या शेख अरान नामक विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यात शेख अरान या चिमुकल्यास मोठी दुखापत झाल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे.

मूर्तिजापूर येथील नगर परिषद च्या स्व. रामदासभैय्या दुबे सेमी इंग्लिश शाळे मध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या शेख अरान व इतर विद्यार्थ्यांमध्ये पावसाच्या छत्री वरून भांडण झाले, या कारणावरून शाळेतील मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांनी शेख अरान या चिमुकल्यास अमानुष मारहाण करून त्याची मान दाबली यात अरान च्या मानेला जबर दुखापत झाल्याचे अरानच्या पालकांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

मात्र या बाबत मुख्याध्यापकांशी संपर्क केला असता प्रदीप झोडपे यांनी इतर ६ ते ७ शिक्षकांच्या मदतीने सदर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. व 'असे काही घडलेच नाही, अरान हा पाय घसरून पडला व त्यास दुखापत झाली असल्याचे सांगा' असे पालकांवर दबाव टाकत असल्याचे पालकांनी बोलतांना सांगितले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी व गटशिक्षणाधिकारी गांभीर्याने घेऊन अरान यास न्याय देऊन शिक्षकावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माझा मुलगा नामे शेख अरान हा इयत्ता दुसरी मध्ये शिकतो आहे. त्याला तेथील प्रदीप झोडपे यांनी मारहाण केली. त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर काही शिक्षक आमच्या घरी आले व त्यांनी कुणालाही न सांगणे किंवा प्रसार माध्यमावर बोलण्यावर दबाव आणला. या अमानुषपणे मारहाणीबद्दल सदर शिक्षकावर कारवाई करून आम्हाला न्याय देण्यात यावा हि विनंती.

- सय्यद रेहान (पालक) मूर्तिजापूर

विद्यार्थ्यांच्या पालकांनी भ्रमणध्वनी वरून माहिती देत प्रत्यक्षरीत्या कार्यालयात येऊन सुद्धा रितसर लेखी तक्रार नोंदवली आहे. यावर एक चौकशी समिती गठीत करून चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर शिक्षक हे दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल.

- एस एस टाले, प्रशासक तथा मुख्याधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP Hike: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 पिकांच्या MSPमध्ये वाढ; गहू, हरभऱ्याला आता किती भाव?

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘जयंत पाटलांचा बाप आला’च्या घोषणा

Gangapur Crime: गंगापूर-खुलताबादच्या शेतवस्त्यांवर चोरट्यांची दहशत; आमदार प्रशांत बंबांकडून रात्रीची गस्त वाढवण्याचे निर्देश

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

E-Peek Survey: दुष्काळाच्या संकटात 'ई-पीक'ची डोकेदुखी;शिरूर कासारमध्ये कचाट्यात शेतकरी; ९६ हजार गटांची नोंदणी रखडली, ओटीपी येईना

SCROLL FOR NEXT