अकोला

माजी आमदार सुरेश इंगळे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : वाशीम विधानसभा मतदार संघाचे (राखीव) कॉंग्रेसचे माजी आमदार सुरेश इंगळे यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ११ ऑगस्ट रोजी रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना वाशीम येथील देवळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. परंतु, प्रकृतीत फारसी सुधारणा होत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी आयकॉन हॉस्पिटल अकोला येथे पाठविले. उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

सन २००४ ते २००९ पर्यंत ते वाशीम मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार होते. त्यानंतर २००८ ते २०१४ पर्यंत ते महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्यासोबत माजी आ. सुरेश इंगळे यांचे अतिशय सलोख्याचे संबंध असल्याने त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे मतदारसंघात खेचून आणली होती.

त्यांनी पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारे प्रकल्प मार्गी लावल्यामुळे आजमितीस तोंडगाव सर्कलमधील परिसरासोबतच हिंगोली जिल्ह्यातील परिसरसुध्दा सिंचनामुळे सुजलाम, सुफलाम झाला आहे. स्थानिक पद्मतिर्थ मोक्षधामावर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीपराव सरनाईक, जिल्हा परिषद सदस्य अरविंद पाटील इंगोले, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले, दीपकराव भांदुर्गे, हाऊसफिनचे माजी संचालक नामदेवराव मापारी मामा, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चक्रधरभाऊ गोटे, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष डॉ. विशाल सोमटकर, प्राचार्य अरुणराव सरनाईक, कंत्राटदार बाळूभाऊ मुठाळ, कार्यकारी अभियंता किशोर माहुरे, कॅप्टन साईदास वानखेडे, प्रा. डॉ. सुभाष जाधव यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुलं, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

IND vs SL 1st Test: देवदत्त पडिक्कल IN, सर्फराज खान OUT! गंभीरने खेळपट्टी पाहिली अन् Playing XI ठरली; जाणून घ्या संभाव्य संघ

Surat-Chennai Expressway : परंडा-तुळजापूर तालुक्यातील 31 गावांत भूसंपादन वेगात; शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींचा मोबदला, 481 हेक्टर क्षेत्र ताब्यात

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

SCROLL FOR NEXT