मुंबईत महापालिकेकडून आज सकाळपासून कारवाई सुरू असून सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागासह संबंधित सर्व पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण परिसरात शांततेत कारवाई सुरू आहे. सध्या कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती दक्षिण विभागाचे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी दिली.