crime e sakal
अकोला

दुहेरी हत्याकांड; शिक्षकाने केली युवकाचा खून, शिक्षकाचाही मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपूर येथे बुधवारी सकाळी ९.३० दरम्यान एका युवकाची भोसकून हत्या करण्यात आली. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेला मारेकरी या घटनेत झालेल्या मारहाणीत जखमी झालेने उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झाला. (Teacher quarrels with youth at Murtijapur, teacher dies)


आदेश आटोटे (३५) याला भोसकून ठार करण्यात आले, तर त्याचा भाऊ किरकोळ जखमी झाला असून, हत्याऱ्यालाही चांगलाच चोप मिळाल्याने तो जखमी झाला. या प्रकरणाला प्रेमाची किनार असल्याचे समजते. आदेश आटोटे औरंगाबादेत वास्तव्यास असून, भाच्याच्या लग्नाच्या निमित्याने तो गावी आला होता. येथील प्रतिकनगरातील जि.प. शिक्षक दीपकराज डोंगरे (५५) याने समशेरपुरात जाऊन आदेशला चाकूने भोसकले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. यावेळी दीपकराजलाही मारहाण झाली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अत्यवस्थ असल्यामुळे त्याला उपचारासाठी अकोल्याला हलविण्यात आले; परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. भांडणाचे कारण मात्र समजले नाही. एसडीपीओ, ठाणेदार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोचले असून, मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Teacher quarrels with youth at Murtijapur, teacher dies

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT