अकोला

बोला आता, तहसीलदारांनीच मागितली लाच!

एसीबीची कारवाई ः स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाच मागितल्याने सहआरोपी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : स्वस्त धान्य दुकानदाराचा धनादेश काढून देण्यासाठी लाच मागितल्याच्या प्रकरणात अकोला तहसीलदार विजय लोखंडे यांना शुक्रवारी लाच लुचपंत प्रतिबंधक विभागातर्फे अटक करण्यात आली.
कोविड-१९ संकट काळात शासनाने गोरगरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत केले.

त्या वाटपाची रक्कमेचा चेक काढून देण्याचे मोबदल्यात ५ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याचे ता. ६ एप्रिल रोजी निष्पन्न झाल्यावरून पुरवठा निरीक्षक नीलेश भास्कर कळसकर यांच्याविरुद्ध ता. ७ एप्रिल रोजी रामदास पेठ पोलिस ठाण्यात एसीबीच्या कारवाईनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान घेण्यात आलेल्या जाबजबाबावरून तसेच प्राप्त व जप्त केलेल्या दस्तऐवजावरून अकोला तहसीलदार विजय लोखंडे यांनी त्यांचे पदाचा दुरुपयोग करून गैरफायदा मिळविण्याच्या अपेक्षेने सार्वजनिक कर्तव्य अनुचीतपणे किंवा अप्रामाणिकपणे केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सदर गुन्ह्यात विजय लोखंडे यांना अकोला तहसील कार्यालयातून शुक्रवारी दुपारी ३.२६ वाजता अटक करण्यात आली.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT