SYSTEM
अकोला

त्रिवेणी संगमावरील वांगेश्वर महादेव भक्तांचे श्रद्धास्थान

धर्मेश चौधरी

तेल्हारा (जि. अकोला) : पूर्णा, विद्रुपा, गौतमा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले वांगेश्वर महादेव मंदिर हे भक्तांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येतात.

तालुक्यातील दक्षिण-पश्चिम भागात निसर्गरम्य वातावरणात पूर्णा, विद्रुपा व गौतमा या तीन नद्यांच्या संगमावर वांगेश्वर महादेव मंदिर आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. श्रावण महिन्यातील सोमवारी येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनाला येतात. सोमवती अमावास्येला येथील संगमावर स्नान व दर्शन करण्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या व्यतिरिक्त ग्रहणकाळात सुद्धा भाविक येथे स्नान व दर्शनासाठी येतात. प्राचीन असलेल्या या मंदिरात महादेवाची उत्तरमुखी महादेवाची पिंड असून, पिंडीच्या पूर्वेस पांढऱ्या पाषाणाची नंदीची मूर्ती आहे.

पर्यटनाला संधी, गोरक्षण

मंदिराच्या दक्षिण दिशेला पूर्णा नदी वाहत असून, पूर्वेस त्रिवेणी संगम आहे. नदीचे झुळझुळ वाहणारे पाणी मनाला भुरळ घालते. मंदिर उंचस्थळावर असल्याने येथून नयनरम्य दृश्य पहावयास मिळते. त्यामुळे येथे पर्यटन विकासाला चांगली संधी आहे. याठिकाणी नारायण नागबली व कालसर्प योगाची शांतीकरिता पूजन केली जाते. त्र्यंबकेश्वर नंतर याठिकाणी सदर पूजेला विशेष महत्त्व आहे. संस्थानच्या वतीने या ठिकाणी गोरक्षण संस्था चालविण्यात येत असून, याठिकाणी मोठ्या प्रमाणात गाई आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT