covid 19 vaccination esakal
अकोला

अकोला : पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या अकरा लाखांवर

कोरोनाचा दुसऱ्या डोससाठी प्रोत्साहन आवश्यक

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यातील(akola) ११ लाखांवर नागरिकांना आतापर्यंत कोरोनाचा पहिला डोस(corona vaccine first dose) घेतला आहे. सोमवारी (ता. २७) दुपारी जिल्ह्यातील पहिल्या डोस घेणाऱ्यांच्या संख्येने अकरा लाखांचा आकडा ओलांडला. त्यामुळे ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक असली तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अद्याप कमीच असल्याने ती वाढवण्यासाठी नागरिकांना प्रोत्याहित करणे आवश्यक असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. देशात कोरोना विषाणूचा() corona प्रादुर्भाव कमी होत असतानाच १६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोविड-१९ विरोधात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण(vaccination) करण्यात आले.

त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्त व १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम खुली करण्यात आली.

या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने अधिक प्रमाणात नागरिक कोरोनाची लस घेत आहेत. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी अद्याप कोरोनाची लस न घेतल्याने आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अधिक गतीने करण्याचे अभियान हाती घेतले आहे. त्यानुसार आगामी १४ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कवच कुंडल अभियान राबवण्यात आले. त्यासोबतच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. यासर्वच प्रयत्नांमुळे आता लसीकरणाची गती वाढली आहे.

असे करण्यात आले लसीकरण

पहिला डोस - ११ लाख ४१४ नागरिक

दुसरा डोस - ५ लाख ८१ हजार ७७२ नागरिक

दोन्ही डोस - १६ लाख ८२ हजार १८६ नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

ST Bus Fire : धावत्या एसटी बसने घेतला पेट; कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४० प्रवाशांचे वाचले प्राण

Weather Updates: मेघगर्जना अन् विजांचा कडकडाट! पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात कसा असेल पाऊस? हवामान विभागाचा अंदाज

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

अकोल्यात हातात बांगड्या, ओठांवर लिपस्टिक... धावत्या ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढणं पडलं महागात; टवाळखोराला अनोखी शिक्षा

SCROLL FOR NEXT