AKOLA  SAKAL
अकोला

पोटनिवडणूकीचे चित्र उद्या स्पष्ट होणार ; २५६ उमेदवारांचे अर्ज वैध

निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या नावांची यादी मंगळवारी (ता. २०) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पोटनिवडणूक प्रक्रियेत एकूण २५६ अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे लढतींचे बहुतांश चित्र मंगळवारीच स्पष्ट होईल.

राज्य निवडणूक आयोगाने अकोला जिल्हा परिषद, पंचायत समितीसह राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम १३ सप्टेंबर रोजी जाहीर केला. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेच्या १४ व पंचायत समितीच्या २८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठीची आचारसंहिता १३ सप्टेंबरपासून पुन्हा लागू झाली आहे. ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजेच ६ सप्टेंबर पर्यंत अंमलात राहील.

निवडणुकीच्या प्रचार काळात प्रचार सभेकरिता जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी राहिल. त्यासोबतच उमेदवार व राजकीय पक्षांसह निवडणूक घेणाऱ्या शासकीय विभागाला २२ जून २०२१ रोजीच्या पत्रान्वये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असा उल्लेख राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात करण्यात आला आहे

असा आहे निवडणूक कार्यक्रम

  1. नामनिर्देशनासंदर्भात न्यायालयात जाण्याची अंतीम मुदत:- २४ सप्टेंबर

  2. न्यायालयाने अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची शेवटची तारीख- २७ सप्टेंबर

  3. न्यायालयाच्या निकालानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे - २७ सप्टेंबर

  4. उमेदवारी मागे घेणे (अपील नाही तेथे) - सोमवार २७ सप्टेंबर (दुपारी ३ पर्यंत)

  5. उमेदवारी मागे घेणे ( अपील आहे तेथे) - २९ सप्टेंबर (दुपारी ३ पर्यंत)

  6. उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप ( अपील नाही तेथे) - २७ सप्टेंबर

  7. उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशाणी वाटप ( अपिल आहे तेथे) - २९ सप्टेंबर

  8. मतदानाची तारीख - ५ ऑक्टोबर २०२१

  9. मतमोजणी- ६ ऑक्टोबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT