loksabha Election Voting sakal
अकोला

Loksabha Election Voting: युरोप मधून येऊन युवकाने बजावला मतदानाचा हक्क ; देशाप्रती दाखविला अभिमान

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी व महाराष्ट्र राज्याचे शेवटचे टोक म्हणून असलेल्या सोनाळा येथील तरुणाने युरोप मधून येऊन मतदानाचा हक्क बजावला. बुलढाणा लोकसभा निवडणूक मध्ये बऱ्याच मतदारांनी नाराजी दाखवत आपले कर्त्यव्य बजावले नाही.

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी व महाराष्ट्र राज्याचे शेवटचे टोक म्हणून असलेल्या सोनाळा येथील तरुणाने युरोप मधून येऊन मतदानाचा हक्क बजावला. बुलढाणा लोकसभा निवडणूक मध्ये बऱ्याच मतदारांनी नाराजी दाखवत आपले कर्त्यव्य बजावले नाही. मात्र दुसरे देशात असताना आपल्या देशातील लोकशाहीचा अभिमान असल्याचे सदर तरुणाने मतदान करून दाखवून दिले.

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील मयूर बाठे हा युवक गेल्या तीन वर्षांपासून युरोप देशातील रोमानिया शहरात खाजगी नोकरी साठी स्थायिक आहे. परदेशात नोकरी कामाने असले तरी देशाभिमान महत्वाचं मानून लग्ना साठी आलेल्या मयूर ने अगोदर मतदाना ला प्राधान्य देत मित्रा सोबत जिल्हा परिषद मराठी प्राथमिक मुलांची शाळा येथे जाऊन मतदान केले .

मयूर चे लग्न आणि मतदान एकाच दिवशी दि 26 एप्रिल ला होते. लग्न लागण्यासाठी अकोला येथे जाणार होते त्या पूर्वी मतदान करून च जाण्याचा निर्णय मयूर ने घेतला. याच गावातील दुसरे नवरदेव भूषण शेटे यांनी पण मयूर प्रमाणे लग्ना आधी मतदान ला प्रथम प्राधान्य देऊन आपले कर्तव्य बजावले.

या वेळी मतदान केंद्रावर सोनाळा येथील प्रथम नागरिक सरपंच हर्षल खंडेलवाल, सर्व अधिकारी,तलाठी,मतदान केंद्रावरील BLO यांनी दोन्ही वराचे आभार मानून त्यांचे स्वागत केले. व दोघांना पुढील सांसारिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.मतदान हा आपला जन्म सिध्द हक्क आहे.सर्वांनी मतदान करावे.असे या दोन्ही नवर देवां कडून तरुणाईला संदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर मागे; कॉकरोच जनता पार्टीची घोषणा, सरकारसोबतच्या चर्चेनंतर निर्णय

Thackeray Brothers: 'एक मच्छर माणसाला...' चित्रपटाचा डायलॉग म्हणत ठाकरेंचा सरकारवर निशाणा; प्रधानांच्या राजीनाम्यावर मोठी प्रतिक्रिया

Bank News: 27 जुलैपासून बँका किती दिवस सुरू राहणार? ITR भरणाऱ्या आणि बँकेत जाणाऱ्या ग्राहकांनी जाणून घ्या

Live Updates Marathi : आपण ही शांतता कायम राखू आणि भविष्यात कुठेही काहीही चुकीचे घडणार नाही - सोनम वांगचुक

Supreme Court Decision: सुप्रीम कोर्टाचा दिलासा; या शिक्षकांना मिळू शकतो ९ लाखांपर्यंतचा एरिअर, अनेकांची स्वप्ने साकारण्याची आशा

SCROLL FOR NEXT