अकोला

‘एक उब जाणिवेची’, मदतीसाठी आले हजारो हात समोर

सकाळ वृत्तसेवा

मानोरा (जि.वाशीम) ः मृत्यूनंतर आपल्या सोबत शरीरावरच्या कापडाशिवाय काहीही सोबत येत नाही. हे ज्यांना समजतं त्यांच्या खिशात किती रक्कम आहे? यापेक्षा त्यांचा दातृत्वाचा हात फार मोठा आहे. दातृत्वासाठी माणूस पैशाने श्रीमंत असून चालत नाही, तर त्यासाठी माणसाच्या मनाच्या श्रीमंतीची गरज असते. अशाच काही व्यक्तींचा समूह म्हणजे ‘एक उब जाणिवेची. दोन वर्षांपूर्वी गरिबांचे दुःख, दारिद्र्य, पाहून एक ‘उब जाणिवे’ची या संस्थेची नव्हे तर कुटुंबाची स्थापना झाली.

घरातील जुने पण वापरण्यायोग्य कपडे धुवून कारंजा व मानोरा परिसरातील गरजवंतांना वाटण्यात आले. परंतु, नंतर मात्र कोरोनामुळे जुने कपडे वाटायचे नाही, असे ‘एक उब’ परिवाराने ठरविले. शरीराची लाज झाकण्यासाठी पण पुरेसे कपडे कोणाकडे नसतात त्यातचं भुकेचा प्रश्न ही खुप मोठा असतो. या सार्वांना मदतीची गरज होती, पण त्यातही ते अति गरजवंत असावे यावर सर्व सदस्याचा कटाक्ष होता. पाहण्यात असे ही काही कुटुंब आले की, खाणारे सात जण व कमविणारा एकही नाही.

यामध्ये काही व्यक्ती शारीरिक असमर्थतेमुळे प्रचंड इच्छा असूनही कुटुंबासाठी काहीही करू शकत नव्हते. काही घरांमध्ये वयस्कर आई व तिची विधवा मुलगी, असे विविध प्रकारचे कुटुंब सदस्यांना भेटत गेले. दोघींच्या आजारपणामुळे दोघीही कुठल्याच प्रकारचे शारीरिक श्रम करू शकत नव्हत्या. दोन वेळच्या जेवणाचे वांधे होते अशावेळी एक ‘उब जाणिवेची’ धावून गेली. लोकांनाही ‘एक उब’ परिवाराबद्दल माहिती होऊ लागली आणि मदतीचा ओघ सुरू झाला. मग त्यामध्ये काही संस्था व काही दानशूर दाते ‘एक उब’ला मदत करण्यासाठी पुढे आले. मदत करणाऱ्या लोकांचा एक व्हॉट्सऍप ग्रुप तयार झाला.

यावर मदत झाल्याबद्दलची बिले व ‘एक उब’ला आलेली रक्कम व खर्च असा हिशोबच मांडण्यात येऊ लागला. त्यामुळे पैशातील पारदर्शकता सर्वांसमोर येत राहिली. मग कुणाचा वाढदिवस असो, कुणाच्या घरी तेरवी असो, कुणाचं कुठल्याही प्रकारचे सुख-दु:खाचे कार्यक्रम असो तेथील सदस्य पाचशे, हजार, दोन हजार अशी रक्कम एकूण ‘उब’ला देऊ लागला. वंचित कुटुंबातील महिलांना इतर साहित्यांसोबत बांगड्या, साड्या यासारख्या वस्तू जेव्हा सदस्यांनी नेऊन द्यायला लागले, तेव्हा दुःखी चेहऱ्यावरचे हास्य पाहून ‘एक उब’ला आणखी काम करण्याची प्रेरणा मिळत गेली. काही गरजवंत महिलांनी ही मदत पाहुन आपल्या अश्रुंनाही वाट मोकळी करून दिली. निराधारांचा आधार बनत गेलं की, जगण्याला अर्थ येत जातो. मग कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य फुलवत राहणे हाच मग ध्यास बनत राहतो. अशा दुःखी, वंचित कुटुंबाला तुम्ही सुद्धा मदत करु शकता त्यासाठी मोहीत गावंडे व नरेंद्र खाडे यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. आपली अल्पशी मदतही एका कुटुंबाचे वर्तमान बदलून भविष्य घडवू शकते.

काही कुटुंबही दत्तक घ्यावे लागले

काही कुटुंबातील घरात काम-धंदे करणारं कुणीच नसल्याने त्यांना किराणा माल देण्यास सुरुवात झाली. महिन्याच्या-महिन्याला धान्याची कीट व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचू लागली. ‘एक उब जाणिवेची’ परिवाराला काही कुटुंब दत्तक घेऊन त्याचे पालकत्व स्वीकारावे लागेल.

या गावात पोहचली मदत

आतापर्यंत कारखेडा, वरोली, भुली, कोंडोली, अंतरखेड, दादगाव, सोमठाणा, कारंजा, उंबर्डा बाजार, पिंप्री (वरघट), धनज, बेंबळा, पारवा (कोहर), शिवणी, पिंप्री (मोखड), कुपटा, इंझोरी, शेलुवाडा, धामणी (खडी), वालई, सिंगडोह, शिंगणापूर, गिरोली, कोळी, शहा, वाई (लोहारा) इत्यादी गावातील शेकडो गरजू कुटुंबांना ‘एक उब जाणिवे’ने मदत केली आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT