अकोला

किरीट सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक, शाई फेकल्याने काढता पाय

सकाळ डिजिटल टीम

वाशीम : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या ताफ्यातील वाहनांवर शिवसैनिकांनी दगडफेक व शाईफेक केली. पोलिसांनी संबंधित शिवसैनिकांना घटनास्थळावरून हुसकावून लावले. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर शंभर कोटींच्या घोटाळ्याचे आरोप सोमय्या यांनी केले आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी शुक्रवारी वाशीमचा दाैरा आखला होता.

भाजप नेते किरीट सोमय्या हे बालाजी पार्टीकल बोर्ड कारखाना देगाव येथे गेले असता त्यांच्या वाहनाचा ताफा पोहोचत नाही तोच उपस्थित शेकडो शेतकरी, महिला व शिवसैनिक आक्रमक झाले. तेवढ्यात एक दगड सोमय्या यांच्या गाडीजवळ पडला. तसेच एका घोळक्यातून सोमय्या यांच्या गाडीवर शाईफेक झाली. प्रसंगावधान राखत पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. किरीट सोमय्या मात्र गाडीतून न उतरता समोर निघून गेले.

या घटनेनंतर किरीट सोमय्या, आमदार राजेंद्र पाटणी यांनी रिसोड पोलिस ठाणे गाठले. मात्र, तेथे कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. भाजप नेते सोमय्या यांनी येथे येण्यापूर्वी  अकाेल्यात चार शिवसैनिकांचे घाेटाळे  उघडकीस आणणार असल्याचा दावा पत्रकारांशी संवाद साधताना केला हाेता. त्यामध्ये त्यांनी खासदार भावना गवळी यांचा नामाेउल्लेख केला हाेता. खासदार गवळी यांच्या संस्थेच्या कारखान्याची पाहणी करण्यासाठी साेमय्या आले हाेते. त्यावेळी खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी साेमय्यांच्या वाहनाच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवीत निषेध नाेंदविला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: लालकृष्ण अडवाणी राहुल गांधींना 'भारतीय राजकारणातील हिरो' म्हटले नाहीत, फेक पोस्ट व्हायरल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाची उडाली तारांबळ; 20 मिनिटं हॉटेलबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Pradip Sharma Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर

Mallikarjun Kharge: मतदानाच्या टक्केवारीत अनेकदा बदल, खर्गेंनी व्यक्त केला संशय; निवडणूक आयोगानं फटकारलं

SCROLL FOR NEXT