to collect the arrears of salary two demands physical intimacy abuse crime  Sakal
अकोला

Akola Crime : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंतासह दोघांनी थकीत पगार काढण्याकरिता महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शाखा अभियंतासह दोघांनी कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचा पगार काढण्याकरिता तिला शरीर सुखाची मागणी करीत विनयभंग...

सकाळ वृत्तसेवा

Akola News : येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शाखा अभियंतासह दोघांनी कंत्राटी महिला कर्मचाऱ्याचा पगार काढण्याकरिता तिला शरीर सुखाची मागणी करीत विनयभंग केल्याची घटना ता. ११ एप्रिल व २० जून रोजी घडल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात ता.९ जुलै रोजी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणारी महिला घटनेच्या दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात कर्तव्यावर असताना सदर महिलेचा पगार न निघाल्याने शाखा अभियंता यांना त्यांच्या ऑफिसमध्ये सांगण्याकरिता गेली असता ‘मी काही एसडीओ नाही, मी काही करू शकत नाही’, असे सांगत ‘जर तू आमच्या म्हणण्याप्रमाणे वागशील जसे सांगू तसे करेल’,

असे म्हणत शरीर सुखाची मागणी केली असता, सदर महिला कर्मचाऱ्याने त्यांची मागणी धुडकावून लावली. ता. २० जून रोजी पुन्हा श्री. कपिले यांच्या चेंबरमध्ये गेली असता त्यांनी डोळ्याने इशारा करीत सदर महिलेचा विनयभंग केल्याच्या तिच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे डी.बी कपिले व आर. इंगळे उपविभागीय अभियंता कार्यालय, मूर्तिजापूर या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरुण मेश्राम करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला कुस्तीपट्टूंच्या लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण सिंह निर्दोष; कोर्टाने काय म्हटलं?

Gold Rate Today: ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव घसरले! उच्चांकापासून 36 हजारांनी स्वस्त; आजचा ताजा भाव पाहा

Kolhapur Illegal Abortion Case : 300 गर्भपातांची कबुली अन् 'मुलगाच' होण्याचे औषध! डॉ. गायकवाडच्या काळ्या कारनाम्यांचा कोल्हापुरात भांडाफोड, 40 महिलांची नावे पोलिसांच्या हाती

Pune Miraj Railway:‘रेल्वे’चे कुंपण शेतकऱ्यांच्या मुळावर! कऱ्हाड तालुक्यातील ४५ गावांचे शेतरस्ते बंद; शेतकरी झाले आक्रमक

Latest Marathi News Live Update : विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित

SCROLL FOR NEXT