corona-viris-akl_202003383651.jpg 
अकोला

 पदोन्नतीच्या नावाने रिक्तपद भरण्याला टोलवाटोलवी

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः दोन दिवसांपूर्वी अकोल्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील परिचारीकांची रिक्त पदे भरण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात येथील परिचारिकांची रिक्त पदे ही पदोन्नतीची असल्याने ती तत्काळ भरणे शकय नाही. त्यामुळे केवळ वर्ग चारची रिक्त पदे तत्काळ भरण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अकोल्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे 4 जून रोजी दौऱ्यावर होते. यावेळी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील प्रसूती विभाग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. यामुळे सर्व महिलांना जिल्हा स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यासोबतच जिल्हा स्त्री रुग्णालयात या महिलांची काळजी घेण्यासाठी आवश्‍यक असणारे मनुष्यबळ याचाही आढावा घेतला होता. दरम्यान त्यानी परिचारिकांसह वर्ग चारची रिक्त पदे दोन दिवसांत भारण्याचे आदेश दिले होते. परंतु, जिल्‍हा स्त्री रुग्णालयातील परिचारिकांची पदे ही पदोन्नतीची असल्याने ती तत्काळ भरणे शक्य नाही. आशा परिस्थितीत केवळ वर्ग चारची रिक्त पदे भारण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. पदभरती संदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लेडी हार्डिंगमधील रिक्त पदे
जिल्हा स्त्री रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सुश्रुषा संवर्गातील 16 पदे रिक्त आहेत. ही सर्व रिक्त पदे पदोन्नतीची असल्याने त्यांची थेत भर्ती शक्य नाही. तर वर्ग चारमधील 19 पद रिक्त आहेत. या पदांची भर्ती प्रक्रिया सुरू आहे.

कंत्राटी पद भर्ती
जिल्हा स्त्री रुग्णालयातील पदभरती ही पूर्णतः कंत्राटी स्वरुपाची राहणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने ही पदभरती रबविणे शक्य आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सुश्रुषा संवर्गातील पद रिक्त आहेत. ही सर्व रिक्त पदे पदोन्नतीची असल्याने त्यांची थेट भरती शक्य नाही. मात्र वर्ग चार मधील १९ पद रिक्त आहेत. या पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT