court sakal media
अकोला

अकोला : उमेदवारीविरोधात न्यायालयात जाण्याची शेवटची संधी उद्या

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पाेटनिवडणुकीत वैध उमेदवारांच्या नावांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. २१) जाहीर केली.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत वैध उमेदवारांच्या नावांची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. २१) जाहीर केली. त्यामुळे संबंधित निर्णयाविरोधात जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल दाखल करण्याचा शुक्रवार (ता. २४) शेवटचा दिवस आहे. यादिवसा अखेर किती उमेदवारांच्या उमेदवारी विरोधात न्यायालयात अपिल दाखल करण्यात येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने अकोला जिल्हा परिषद, पंचायत समितीसह राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम १३ सप्टेंबर रोजी जाहीर केला. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेच्या १४ व पंचायत समितीच्या २८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठीची आचारसंहिता १३ सप्टेंबरपासून पुन्हा लागू झाली आहे. ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजेच ६ सप्टेंबर पर्यंत अंमलात राहील.

निवडणुकीच्या प्रचार काळात प्रचार सभेकरिता जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी राहिल. त्यासोबतच उमेदवार व राजकीय पक्षांसह निवडणूक घेणाऱ्या शासकीय विभागाला २२ जून २०२१ रोजीच्या पत्रान्वये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असा उल्लेख राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात करण्यात आला आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेअंतर्गत जिल्हा न्यायालयात अपिल दाखल करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर असल्याने कोण कोणाविरोधात न्यायालयात अपिल दाखल करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अपिलावर सुनावणी सोमवारी

निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या उमेदवारी विरोधात जिल्हा न्यायालयात न्यायाधीश सोमवारी (ता. २७) सुनावणी घेतील. त्यावर त्याच दिवशी जिल्हा न्यायाधीश निर्णय देतील. त्यानंतर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT