file photo 
अकोला

अडीच लाख नागरिकांनी घेतली लस!

कोरोना संकट ः लसीकरण मोहिमेला हवी गती; रांगा वाढत्याच

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्यात कोरोना (Corona) प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन लाख ५७ हजार ४३५ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यामध्ये दोन लाख तीन हजार ४३६ लाभार्थ्यांनी कोरोनाचा पहिला तर ५३ हजार ९९९ लाभार्थ्यांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. लस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने व लसींचा कायम तुटवडा जाणवत असल्याने लसीकरण मोहिमेत सतत खंड पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढविल्यास लसीकरण केंद्रावर दिसणाऱ्या रांगा कमी होणार नाही. Two and a half lakh citizens vaccinated in Akola!

संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच ता. १६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले.

त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांच्या जवळपास असून सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्‍या संख्येने लस घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत असल्याने लसींचा नेहमीच तुटवडा जावणत आहे. दरम्यान अकोला जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार ४३५ लाभार्थ्यांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे.

वयगटानुसार असे आहेत लस घेणारे लाभार्थी

वय गट लाभार्थी संख्या

६० वर्षांवरील ८४ हजार ६४७

४५ ते ६० ८५ हजार ३८२

३० ते ४५ २० हजार ४९२

१८ ते ३० १२ हजार ८५८

लसीकरणात महिलांपेक्षा पुरूष समोर

कोरोना प्रतिबंधात्म लसीकरणात महिलांच्या तुलनेत पुरुषांनी आघाडी घेतली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ११ हजार २०१ पुरुषांनी तर ९१ हजार ५२० महिलांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी महिलांच्या तुलनेत पुरूषांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.

संपादन - विवेक मेतकर

Two and a half lakh citizens vaccinated in Akola!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Latest Marathi News Live Update : वर्धा बाजार समितीत गव्हाची वाढली आवक

Weekly Horoscope : 'या' 5 राशींना होणार आदित्य मंगल योगाचा लाभ; करियरमध्ये होणार प्रगती आणि नव्या संधी

Pune University: पुणे विद्यापीठात आर्थिक गैरव्यवहार? 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एका महिन्यात निविदा

Gas Shortage: भारताने शोधला होर्मुजला पर्याय! 'या' मार्गाने होतोय मुबलक तेल पुरवठा

SCROLL FOR NEXT