Two days before ST will stop accepting notes 2000 remember this date 30 sep rbi  Sakal
अकोला

2000 Note : दोन हजाराची नोट घेऊन प्रवास करता, तर ही तारीख ठेवा लक्षात!

अंतिम मुदतीच्या दोन दिवसांपूर्वीच एसटीकडून नोट स्वीकारणे होणार बंद

सकाळ वृत्तसेवा

अकोला : एसटी बसने प्रवास करीत असाल आणि तिकिटासाठी दोन हजारांची नोट घेवून जात असाल तर २८ सप्टेंबर ही तारीख नक्की लक्षात ठेवा. दोन हजारांची नोट चलनातून बाद करण्यासाठी ३० सप्टेंबर ही मुदत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली.

त्यापूर्वी दोन दिवस आधीपासूनच राज्य परिवहन महामंडळाने ही नोट न स्वीकारण्याच्या सूचना सर्व विभागातील वाहकांना दिल्या आहेत. सध्या चलनात असलेली सर्वात मोठी नोट दोन हजारांची आहे.

मात्र, ती आता २४ दिवसांचीच सोबती असून, त्यानंतर म्हणजे ३० सप्टेंबरनंतर चलनातून ही नोट बाद होणार आहे. सध्या बँकेतून ही नोट बदलून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बँकेत दोन हजारांची नोट स्वीकारण्यासाठी शनिवार, ता. ३० सप्टेंबरच्या मध्य रात्री १२ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

अर्थातच बँकेच्या कामाच्या वेळेपर्यंतच ती स्वीकारली जाणार आहे. एसटी महामंडळाच्या सर्वच विभागातून तिकिटाची जमा होणारी रक्कम ही त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी संबंधित बँकेच जमा केली जाते.

...तर वाहकांना भरावी लागणार रक्कम

एसटी प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार ता. २८ सप्टेंबरपर्यंतच दोन हजारांची नोट वाहकांना प्रवाशांकडून स्वीकारता येणार आहे. विशेष म्हणजे, ही नोट त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ता. २९ सप्टेंबरला आगारातील बँकेत भरण्याची सूचना करण्यात आली.

त्यानंतर वाहकांकडून येणाऱ्या दोन हजारांच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत. अशी नोट वाहकांनी प्रवाशांकडून स्वीकारल्यास त्याची रक्कम वाहकाला भरून द्यावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बोगस शालार्थ आयडी! ‘एसआयटी’ने पुन्हा मागितली ३ महिन्यांची मुदतवाढ; ३ लाख कर्मचाऱ्यांच्या पडताळणीस लागतोय वेळ; थर्ड पार्टी तक्रारींवरही आता कार्यवाही

24 ऑगस्ट 2026 पंचांग! श्रावणी सोमवारला आज कोणते शुभ मुहूर्त? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - २४ ऑगस्ट २०२६

Shravan Special Recipe: १ वाटी भगर अन् ओले खोबरे; उपवासासाठी बनवा मऊसूत आणि जाळीदार वरीचे घावन!

ढिंग टांग : पुणे म्हंजे प्रेम..!

SCROLL FOR NEXT