Two died and three were seriously injured when an ambulance tire burst in Buldana 
अकोला

जीवनवाहिनी ठरली काळ! अँब्युलन्सचा टायर फुटल्याने अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : मरण कधी आणि कुठे, कोणत्या स्वरूपात येईल हे काहीच सांगता येत नाही. दिवसभर पोटाची आग विझविण्यासाठी रणरणत्या उन्हात भटकंती करून रस्त्याच्या कडेला झोप घेतलेल्यांना स्वप्नातही वाटले नसेल असा काळ त्याचा जीव घेईल आणि होत्याचे नव्हते होईल. जखमी, तातडीने उपचार घेण्यासाठी एकाठिकाणाहून दुसर्‍याठिकाणी नेण्यासाठी जीवनवाहिनी ठरत असलेली रुग्णवाहिकाच काळ म्हणून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या ५ व्यक्तींना चिरडले. त्यातील दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर झाल्याची घटना बुधवारी (ता. १७) मार्चच्या मध्यरात्रीनंतर घडली.
 
बुलडाणा शहरातील त्रिशरण चौकातील परिसरात रस्त्याच्या कडेला उदरनिर्वाहासाठी शेतीउपयोगी साहित्य विक्री करणारे काही व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्याला आहे. कोरोना काळात ग्रामीण भागात रोजगार नसल्यामुळे शहरात साहित्य विक्री करून उदरनिर्वाह चालविणारे हे पाच ते सहा व्यक्तींचे कुटुंब. आज हे शहर तर उद्या दुसरे असे करत जीवनासोबत संषर्घ करत असतानाच १७ मार्चची रात्र त्यांच्यासाठी काळरात्रच ठरली. त्रिसरण चौकात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या घिसडी समाजाच्या लोकांचे रस्त्याच्या कडेला पाल टाकून विळे, कुर्‍हाडी, तवे अशी लोखंडी साहित्य तयार करून विकून पडोळकर व सोळंके कुटुंबीय आपली उपजीविका चालवत होते. 

रात्री १२ ते १ च्या दरम्यान काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि भरधाव वेगाने येणार्‍या रुग्णवाहिका क्रमांक एमएच एमएच २८ बी ७१३६ चे टायर फुटल्याने रुग्णवाहिका थेट रस्त्याच्याकडेला झोपलेल्या परिवारातील सदस्यांच्या अंगावर चढली. यात अनिल गंगाराम पडोळकर (वय २९ वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला तर यातील जखमी बेबाबाई शेषराव सोळंके (वय ३५ वर्षे), आकाश अनिल पडोळकर (वय ४ वर्ष), शेषराव लक्ष्मण सोळंके (वय ४० वर्ष), मायाबाई अनिल पडळकर (वय ३० वर्ष) हे सर्व रा. पारधीबाबा मंदिराजवळ चिखली येथील रहिवासी आहे. जखमीमधील मायाबाई अनिल पडळकर (वय ३० वर्षे) या गंभीररीत्या जखमी झाल्याने यांना अकोला येथे रात्रीच रेफर करण्यात आले होते. परंतु, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह अकोल्यावरून बुलडाण्यासाठी रवाना झाला आहे. 

रात्री पोलिसांना माहिती मिळताच पीएसआय सुधाकर गवरगुरु, हेडकॉन्स्टेबल प्रशांत शास्त्री, माधव पेटकर, गंगेश्वर पिंपळे, अमोल खराडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून सर्व जखमींना दवाखान्यात पोहोचविले. याप्रकरणी आरोपीचा शोध घेण्यात येऊन चौकशी सुरू केली. तपासचक्रे फिरवले असता त्यांना ही रुग्णवाहिका कोलवड येथील योगेश पुंजाजी जाधव यांची असल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ पोलिसांनी या व्यक्तीसोबतच गाडी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पीएसआय सुधाकर गवारगुरु हे करीत आहे. 

रुग्णवाहिकेच्या देखभालीकडे दुर्लक्ष 

आपातकालीन तसेच तातडीने उपचार देण्यासाठी रुग्णवाहिकेला भरधाव जाण्याची मुभा असते. परंतु, याबाबत काही नियम असून, देखभाल, दुरुस्ती करणे यातील प्रमुख आहे. परंतु, जिल्ह्यातील बर्‍याच रुग्णवाहिकांची स्थिती ही अत्यंत वाईट असून, त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Duleep Trophy Final : 4,4,W,4,W! CSK च्या गोलंदाजाचं मजेशीर षटक; पण, RCB च्या रजत पाटीदारच्या संघाला जेतेपद

Latest Marathi News Updates : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, करमाळ्यातील कोर्टी गाव पाण्याखाली

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

SCROLL FOR NEXT