vaccination the Containing the Gram Panchayat Will receive an award
vaccination the Containing the Gram Panchayat Will receive an award esakal
अकोला

अकोला : लसीकरणात आघाडीवर असणाऱ्या ग्रामपंचायतींना मिळणार पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोविड-१९(Covid-19) च्या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण(Vaccination) प्रभावी माध्यम आहे. नागरिकांनी लसीकरण?(Vaccination) करावे याकरीता प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. ग्रामीणस्तरावर लसीकरणाला गती देण्यासाठी जिल्हा परिषद(Zilla Parishad) व जिल्हा प्रशासनाव्दारे ग्रामपंचायतींसाठी प्रोत्साहनपर योजना राबविली जात आहे. त्यानुसार शुक्रवार ३१ डिसेंबरपर्यंत गावाच्या उद्दिष्टाच्या ९० टक्के पेक्षा जास्त लसीकरण करुन घेणाऱ्या ग्रामपंचायतींना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.

ग्रामपंचायत स्तराव कोविड लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. त्यासाठी रविवार १० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती आता ३१ डिसेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी घेतला आहे. या अंतर्गत ९० टक्के पेक्षा जास्त लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतीना तालुकास्तरावर लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीना विशेष पुरस्कार देण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपचायंतींमधून लकी ड्रॉ पद्धतीने तीन ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावरुन विशेष पुरस्कार देण्यात येतील. ९० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण करणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींना सन्मानपत्र देण्यात येईल. स्पर्धेत विजेता ग्रामपंचायतीना सर्व पुरस्कार जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येतील.

पहिला डोस पूर्ण होणे आवश्यक

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या भागातील नागरिकांना पहिला डोस पूर्ण करणे व देय असलेल्या दुसऱ्या डोसबाबत नागरिकांना प्रेरित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या. तसेच आपल्या गावातील नागरीकांनी जास्तीत जास्त लसीकरण करुन या मोहिमेमध्ये सहभाग घेण्याबाबत आवाहन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT