भाजीपाला  भाजीपाला
अकोला

नॉनव्हेज पेक्षा व्हेज महागले!; भाजीपाला आता श्रीमंतासाठीच

शरद येवले

मंगरुळपीर (जि. अकोला) : कांदा-बटाटा वगळता बहुतांश सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. लहरी पावसामुळे घटलेले उत्पादन, इंधन दरवाढ आणि पितृपक्ष पंधरवड्यामुळे मागणीत झालेली वाढ यामुळे भाज्यांचे दर कडाडले आहेत. चारपटीने दर वाढल्याने गरिबांना मात्र, तूरडाळ शिवाय पर्याय नसल्याचे चित्र सध्या आहे.

काही दिवसांपूर्वी २० रुपये किलोला विकला जाणारा टोमॅटो आता ८० ते १०० रुपयांवर पोहोचला आहे. वाढलेल्या डिझेलच्या भावाचाही परिणाम भाज्यांच्या दरावरही झाला आहे. ४० रुपयांना विकली जाणारी गवार ८० रुपये किलो विकली जात आहे. प्रत्येक भाज्यांमागे ४० ते ५० रुपये प्रतिकिलो भाव वाढला आहे. येथील भाजीपाला बाजारात पावसामुळे आवक कमी झाली आहे.

बाजारात हराशीसाठी रोजच्या येणाऱ्या गाड्यामध्ये कमी झाली आहे. आधी प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी मिळत असलेल्या भाज्यांचा दर आता ३० ते ४० रुपये प्रतिकिलो झाला आहे. घाऊक बाजारात वाढ झाल्याने या सर्व भाज्या किरकोळ बाजारात दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात आहेत. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खचार्त वाढ झाल्याने ही दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे भाजी विक्रेते म्हणत आहेत.

मागील महिन्यात गणेशोत्सव, गौरीपूजन, पितृपक्ष आणि नवरात्र उत्सव, दसरा या सणावारात मांसाहार बंद असतो. त्यामुळे भाज्यांचे सेवन जास्त केले जाते. मात्र, हल्ली भाज्या फार महागल्या आहेत. पाव किलो भाजी आधी ५ ते १० रुपये किलो होती पण आता २० ते २५ रुपये पाव किलो भाजी खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी व श्रीमंताचेच पाय भाजीपाल्याच्या दुकानाकडे वळत आहे. गरीब मात्र, महागलेले दर ऐकून दुकानातून वळून जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे भाज्या महागल्या आहेत. पाऊसही कमी जास्त प्रमाणात असून, उत्पादन कमी आहे. मागे पितृपक्ष असल्यामुळे भाज्यांना मागणी जास्त होती.
- राजेश त्राटक, अडत दुकानदार

किरकोळ बाजारातील किंमत ( प्रतिकिलो)

  • भेंडी - ६० ते ७० रुपये

  • भोपळा - ५० रुपये

  • शिमला मिरची - ८० रुपये

  • दुधी भोपळा - ६० रुपये

  • मिरची- ५० ते ६० रुपये

  • फुल कोबी - ८० रुपये

  • वांगी - १०० रुपये

  • गवार - ६० रुपये

  • टोमॅटो - ८० ते १०० रुपये

  • चवळी शेंग - ६० रुपये

  • पान कोबी - ५० ते ६० रुपये

३० ते ४० रुपयांनी दर वाढले

भेंडी, गवार, टमाटर, फुल गोबी, दोडकी, पालक, मेथी, वांगी आणि शिमला मिरची या भाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या यांचा दर ८० ते १०० रुपये किलो आहे. रिटेलमध्ये याचा फटका जास्त बसतो. कारण, घाऊक बाजारातून गेलेला माल बऱ्याचदा खराब किंवा वाया जातो. त्यामुळे, दुपटीने किंवा तिप्पतीने वाढीव दराने भाज्या विकल्या जातात. आधी भाव ३० ते ३५ रुपये होता तो आता ८० ते १०० रुपये झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: 'गट क' परीक्षेच्या अर्जासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ! 'एमपीएससी'चा निर्णय, 2 हजार 929 पदांसाठी भरती

Vasmat Politics: गोवंश प्रकरणातील गुन्ह्यानंतर वसमतचे उपनगराध्यक्ष इमरान अली यांचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

Mark Zuckerberg: मार्क झुकरबर्गने मागितली माफी! पैशांच्या बदल्यात विशिष्ट कंटेंट प्रमोट केल्याची 'मेटा'कडून कबुली?

Latest Marathi News Live Update : मूळ पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांमधील फरक तसेच त्याशी संबंधित जबाबदाऱ्यांचे स्वरूप, असे अनेक मुद्दे उपस्थित झाले - अनिल देसाई

Ajinkya Rahane: 'धोनीच्या निवृत्तीनंतर विराट-शास्त्रींनी टीम इंडियाची मानसिकता बदलली...' रहाणे स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT