अकोला

अत्यल्प वेतन, 12 तास सेवा; डॉक्टरांचा जीएमसीतच ठिय्या

डॉक्टरांचा जीएमसीतच ठिय्या

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अत्यल्प वेतनात १२ तासांपेक्षा जास्त रुग्णसेवा देणाऱ्या आंतरवासीता डॉक्टरांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने डॉक्टरांना वाढीव कोविड भत्त्यासह आवश्यक सर्वच सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी बुधवारी आंतरवासीता डॉक्टरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयात निदर्शने देत ठिय्या दिला. Very low pay, 12 hours service; The doctor stays with the GM


जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांच्या उपचाराचा बहुतांश भार येथील आंतरवासीता डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. अशा परिस्थितीत अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी २० विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयात जाण्याची परवानगी दिल्याने कामाचा ताण आणखी वाढल्याचा रोष व्यक्त करत आंतरवासीता डॉक्टरांनी बुधवारी दुपारच्या सुमारास अधिष्ठाता यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. मुंबई व पुण्यामध्ये कार्यरत आंतरवासीता डॉक्टरांना गत वर्षी ५० हजार रुपये मानधन देण्यात आले होते.

त्याच प्रमाणे आम्हालाही ५० हजार रुपये मानधन देण्यात यावे. शासनाने सर्वच आंतरवासीता डॉक्टरांना विमा कवच प्रदान करावे. कोविड ड्यूटीदरम्यान आजारी पडल्यास उपचाराची सर्वस्वी जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनादरम्यान आंतरवासीता डॉक्टर निवेदन देण्यासाठी अधिष्ठातांच्या कार्यालयात जाणार होते, मात्र यावेळी अधिष्ठातांनी डॉक्टरांना कार्यालयात प्रवेश नाकारला. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांनी निदर्शने देण्यास सुरुवात केली.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

SCROLL FOR NEXT