In Vidarbha including Akola district, soybean is the most sown crop in kharif 
अकोला

सोयाबीनने गाठली आजपर्यंतची उच्चांकी ; प्रतिक्विंटल पाच हजाराहून अधिक भाव

सकाळ वृत्तसेवा

अकोला : सोयाबीनने आजपर्यंतचे उच्चांकी दर गाठले असून, सध्या प्रतिक्विंटल पाच हजाराहून अधिक दर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळतो आहे. गत पाच वर्षातील सोयाबीनला मिळालेले हे सर्वाधिक भाव असून, पहिल्यांदाच केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या ३८८० रुपये आधारभूत किमतीपेक्षा हजार ते बाराशे रुपये अधिक सोयाबीन उत्पादकांना मिळत आहेत. 

जिल्ह्यासह विदर्भात खरिपामध्ये सर्वाधिक पेरा असणारे व सर्वाधिक उत्पादीत होणारे पीक म्हणजे सोयाबीन. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या खरिपामध्ये सोयाबीन पिकापासून सर्वाधिक अपेक्षा राहतात. परंतु, दरवर्षी दुष्काळ, अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव व इतर कारणांमुळे सोयाबीन पिकाचे उत्पादन सातत्याने घटत आहे. सोबतच व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षाही कमी दराने म्हणजे दोन ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दरानेच सोयाबीनची खरेदी होत असल्याने सोयाबीन उत्पादकांना सातत्याने नुकसान सोसावे लागत आहे.

शासनाच्या हमीभाव केंद्रावर सुद्धा सोयाबीन विक्री करताना शेतकऱ्यांना विविध अटी, शर्तीची पुर्तता करावी लागते. त्यातही कोणत्या ना कोणत्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण उत्पादनाची खरेदी होत नाही व झाली तरी, चुकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांना महिनो प्रतीक्षा करावी लागते. यावर्षी मात्र पहिल्यांदाच सोयाबीनला हमीभावापेक्षा हजार ते १२०० रुपये जादा भाव बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून मिळत आहे. सध्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४५०० तर, कमाल ५१५० रुपये भाव मिळत आहे. 

साठवणूक ठरतेय फायद्याची
 
रब्बीच्या तयारीसाठी तसेच इतर गरजांची पुर्तता करण्यासाठी अर्थाजनाचा पर्याय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पीक काढताच सोयाबीनची विक्री केली. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता ते साठवूण ठेवले त्यांना सध्या चांगला फायदा होत असून, प्रतिक्विंटल हजार ते १२०० रुपये अधिक दर मिळत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT