शेतकऱ्यांना अशाप्रकारे सांडव्याच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे sakal
अकोला

वाशीम : धरणाच्या अर्धवट कामाचा फटका

कोट्यवधी खर्च करून काम अपूर्णच; ७० टक्के पाणी जाते वाया

पी.डी. पाटील

रिसोड : शासनासह अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे व वेळकाढू धोरणामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही पळसखेड धरणात ३० टक्केच पाणीसाठा थांबत आहे. सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे गावालगतच्या शिवारात जाण्यासाठी आठ ते दहा किलोमीटरची पायपीट शेतकऱ्यांना करावी लागत आहे. शेतकरी रोष व्यक्त करत असून, धरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी करत आहेत.

तालुक्यातील पळसखेड येथील धरणाचे काम २००४ पासून रखडलेले होते. विविध प्रकारचे आंदोलने, धरणे, निवेदन दिल्यानंतर प्रकल्पाचे पाणी अडवण्याचे काम २०१९ मध्ये करण्यात आले. मात्र, ३० टक्केच पाणी धरणामध्ये साठवले जात असून, ७० टक्के पाणी सांडव्यामधून वाहून जात आहे. त्यामुळे शासनाने या प्रकल्पाकरिता जो काही कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला तो वाया जात आहे.

शिवाय प्रकल्पामध्ये पाहिजे त्या प्रमाणात पाणी साठविल्या जात नसल्याने शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या पाण्यावर रब्बी हंगाम तसेच उन्हाळी पिके घेता येत नाहीत. त्यामुळे प्रकल्पाचा मुख्य हेतू साध्य होत नाही. या प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना त्याचा पूर्ण मोबदला अद्याप मिळालेला नाही. त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे तसेच पळसखेड गावाच पुनर्वसनाच काम अद्यापही प्रलंबित आहे. प्रकल्पाच्या प्रलंबित कामामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीत. गावाशेजारील नदीकाठच्या शेतात जाण्यासाठी आठ ते दहा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. सांडव्यामधून तीन ते चार फुटापर्यंत पाणी मागील तीन महिन्यापासून वाहात असल्याने शेतकऱ्यांना चक्क रिसोडवरून शेतात जावे लागत आहे. दिवाळीनंतर त्वरित या प्रकल्पाविषयीच्या सर्व समस्या सोडवाव्या, अशी मागणी पळसखेड येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

SCROLL FOR NEXT