Water supply to plantations by stealing electricity Complaint to Collector sakal
अकोला

अकोला : वीज चोरी करून रोपवनाला पाणीपुरवठा!

शेख मो. शेख मकबुल यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; दोषींवर कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : वनविभागाच्या आलेगाव परिक्षेत्रातील रोपवनाला वीजचोरी करून पाणी पुरवठा झाला असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्याचे दर्शवून शासनाकडून लोखोचा निधी लाटण्यात आल्याची तक्रार शेख मोहम्मद शेख मकबुल यांनी जिल्हाधिकारी, महावितरण, जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. दोषींवर कारवाईची मागणी सुद्धा त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अकोला प्रादेशिक वनविभागाच्या परिक्षेत्र-आलेगाव, वर्तुळ-मळसूर, बिट-सावरगाव, शिवार-टेकरखेड येथे शासनाच्या महत्त्वकांक्षी ३३ कोटी वृक्षलागवड (२०१८-१९) या योजनेत रोपवन तयार करण्यात आले. या वृक्षांना पाणी देण्याकरिता शासनाकडून प्रमाणित मंजूर लाखो रुपयांचा निधी ‘टँकरने पाणी दिले’ या बनावटी बिलाद्वारे वसूल करून फस्त केल्याचा आरोप शेख मोहम्मद शेख मकबुल यांनी केला आहे. प्रत्यक्षात या शेकडो हेक्टर परिसरातील मंजूर रोपवनात मौजे टेकरखेड येथील शेतकरी लालचंद लक्ष्मण जाधव या शेतकऱ्याच्या शिवारातील विद्युत खांबावर अवैधरित्या आकोडे टाकून वीज चोरी करत, हजारो फुट पाईपाने रोपवनाला आजही पाणी दिले जात असून, हा भ्रष्टाचार व वीज चोरी उपवनसंरक्षकांच्या परवानगीने, सहा. उपवनसंरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या अधिकारात होत असल्याची तक्रार शेख मोहम्मद शेख मकबुल यांनी जिल्हाधिकारी, महावितरण, पोलिस अधिक्षक यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी व शासनाने या वीज चोरीची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करत गुन्हे दाखल करावे व महावितरणच्या आर्थिक नुकसानीची दंडात्मक वसुली करावी, अशी मागणी सुद्धा शेख मोहम्मद शेख मकबुल यांनी केली आहे.

''अशा तक्रारीची प्रत वनविभागाला मिळालेली नाही. असा कोणताही प्रकार वनविभागात होत नाही. वनविभाग कोठूनही पाणी घेत असेल तर, संबंधित शेतकऱ्यांला विजेच्या बिलासहीत मोबदला दिला जातो. यावर्षी टॅंकरवर पैसे काढलेले नसून, डिसेंबरपर्यंत जंगलामध्ये पाणी उपलब्ध असल्याने ते पाणी या रोपवनाला वापरले आहे.''

- वन अधिकारी, अकोला वनविभाग (प्रादेशिक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : माहिममधील सेंट झेवियर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT