weather update hit wave in akola district temperature rise between 18th and 20th April sakal
अकोला

पुन्हा उष्णतेची लाट!

जिल्ह्यात १८ ते २० एप्रिल दरम्यान तापमान वाढीचे संकेत

सकाळ वृत्तसेवा

अकोला : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेसह पारा ४४ अंशापार गेला होता. आता पुन्हा १८ ते २० एप्रिल दरम्यान अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यावर्षी नेहमीपेक्षा थोडा लवकरच म्हणजे मार्चच्या सुरुवातीपासूनच तीव्र उन्हाळा जाणवायला लागला आणि एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे ३ ते ८ एप्रिल या कालावधित पारा ४४ अंशापार गेला. त्यामुळे यावर्षी एप्रिलमध्येच किमान तापमान ४५ अंश सेल्सिअसचा आकडा पार करेल व उन्हाळ्यात उचांकी तापमान नोंदीचे अंदाज बांधले जाऊ लागले.

एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा पारा ४३ व ४२ अंशावर आल्याने अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिकच असल्याने उष्ण झळा कायम होत्या. आजपासून म्हणजे १८ ते २० एप्रिल दरम्यान पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिल्यामुळे पारा ४५ अंशापार जाण्याची शक्यता असून, यावर्षी तीव्र उन्हाळ्याचे संकट कायम राहणार आहे.

उष्णतेची लाट

तारीख - कमाल तापमान

(अंश सेल्सि.)

३ एप्रिल ४४.०

४ एप्रिल ४४.१

५ एप्रिल ४४.२

६ एप्रिल ४४.०

७ एप्रिल ४३.९

८ एप्रिल ४४.०

एप्रिलचा दुसरा आठवडा

तारीख - कमाल तापमान

(अंश सेल्सि.)

१० एप्रिल ४३.९

११ एप्रिल ४३.७

१२ एप्रिल ४३.०

१३ एप्रिल ४२.३

१४ एप्रिल ४३.६

१५ एप्रिल ४२.९

१६ एप्रिल ४३.७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT