weather update india meteorological department possibility of rain in akola July 8 esakal
अकोला

Akola Rain Update : जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत पावसाची शक्यता; भारतीय हवामान विभागाचा अंदाज

भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

अकोला : भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी वीज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

वारा वादळाचे स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. तसेच स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे देण्यात आल्या आहेत.

मान्सूनच्या पावसाने २५ आणि २६ जूनला सलग दोन दिवस जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात कमी-अधिक स्वरूपात हजेरी लावली. काही भागात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.

२५ जून रोजी रात्री तेल्हारा, अकोट तालुक्यात पाऊस झाला. २६ जून रोजी अकोला, मूर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळीसह पातूर तालुक्यात जवळपास अर्धा ते एक तास पाऊस झाला. परंतु हा पाऊस पेरणी योग्य नसल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा लागली.

जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता. ५) दुपारी व रात्री पाऊस झाला. परंतु हा पाऊस सुद्धा सर्वदूर व जोरदार नसल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान हवामान विभागाने ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT