bacchu kadu esakal
अकोला

अकोल्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणार : बच्चू कडू

भविष्यात उभारल्या जाणार प्लांट

विवेक मेतकर

अकोला: करोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. अकोल्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लान्ट अकोल्यामध्ये उभारण्यात येणार आहे. त्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली. हा प्लान्ट राज्यातीलच नव्हे, तर देशातील पहिला असेल असे ते म्हणाले.

ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्या यासंदर्भात राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यासोबतच सध्यस्थितीत ऑक्सिजन तुटवडा असल्याचा विषयही समोर आला. तेव्हा हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्यासंदर्भात काही करता येईल का, या विषयावर चर्चा करण्यात आली.

लागलीच ही व्यवस्था निर्माण करणाऱ्या एका कंपनीच्या प्रतिनिधीला बोलावून या बैठकीमध्येच त्याचे सादरीकरण दिल्या गेले. आणि कुठलाही वेळ न दडवता याच बैठकीत पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली असल्याची माहिती पालकमंत्री कडू यांनी दिली. हा प्लान्ट महिनाभराच्या आत उभा करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा अकोट या ठिकाणी हा प्लान्ट उभा राहू शकतो. हा प्लान्ट राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिला प्लान्ट राहणार असल्याचेही कडू यांनी सांगितले.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जागतिक GDP मध्ये 40 टक्के वाटा ब्रिक्स देशांचा! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा G7 देशांवर निशाणा

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

SCROLL FOR NEXT