World AIDS Day 2023 esakal
अकोला

World AIDS Day : जनजागृतीने एड्स नियंत्रणात; प्रमाण घटले

काही वर्षांआधी एचआयव्ही, एड्स नावाच्या भस्मासुराने अवघा देश ढवळून निघाला होता, मात्र अवघ्या काही वर्षांत एचआयव्ही, एड्सच्या संदर्भात घडून आलेले बदल अचंबित करणारे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अकाेला - दरवर्षी एक डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एड्स, एचआयव्ही या नावानेही अनेकांना भीती वाटते. त्यामुळेच की काय पण या आजाराची तीव्रता कमी झालेली पाहायला मिळतेय. जिल्ह्यात २०१४ पासून या जीवघेण्या आजाराच्या प्रमाणात सातत्याने घट हाेत आहे. एकूणच हे चित्र अकाेलेकर या आजारा विषयी सजग हाेत असल्याचे दिसून येत आहे.

काही वर्षांआधी एचआयव्ही, एड्स नावाच्या भस्मासुराने अवघा देश ढवळून निघाला होता, मात्र अवघ्या काही वर्षांत एचआयव्ही, एड्सच्या संदर्भात घडून आलेले बदल अचंबित करणारे आहेत. जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथकाच्या कामगिरीमुळे आणि वारंवार हाेणाऱ्या जनजागृतीमुळे भितीदायक अशा या आजाराच्या प्रमाणात घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात २०१४ पासून या जीवघेण्या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी हाेताना दिसत आहे. यावर्षी २०२३-२४ या आर्थिक वर्षात (एप्रिल ते ऑक्टोबर) जिल्ह्यात १३८ रुग्णच एड्स बाधित आढळले आहेत. त्यामुळे एड्सला थांबवण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे सुखद चित्र दिसून येत आहे.

काय म्हणते आकडेवारी

- २०२१-२१ मध्ये जिल्ह्यात ८४ हजार ९०४ एड्सच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये २३२ एचआयव्ही बाधितांचा शोध लागला. २०२२-२३ मध्ये ८८८३३ व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या, तर २३१ एचआयव्ही बाधित मिळून आले. २०२३-२४ (एप्रिल ते ऑक्टोबर) मध्ये ५३ हजार ७०६ व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यातून १२६ एड्स बाधित मिळून आले.

२७ गर्भवतींची प्रसूती सुरक्षित

आरोग्य विभागाकडून महिला गर्भवती असताना तिची एचआयव्ही तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने २०२१-२२ मध्ये ५८ हजार २६४ गर्भवती महिलांची तपासणी केली, त्यात १५ महिलांना एड्स आढळला. २०२२-२३ मध्ये ५२ हजार ९९९ गर्भवती महिलांची तपासणी केली असता १५ व २०२३-२४ (एप्रिल ते ऑक्टोबर) मध्ये ३७ हजार ३५ गर्भवतींची तपासणी केली असता १२ महिलांना एचआयव्हीला लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान जिल्ह्यात २०२१ पासून सुमारे २७ एचआयव्ही बाधित महिलांची सुरक्षित प्रसूती झाली असून त्यापैकी एकही बाळाला एचआयव्हीची लागण झालेली नाही.

चार हजार रुग्णांवर मोफत औषधोपचार

जिल्ह्यात दरवर्षी एक लाख एचआयव्ही तपासण्या करण्यात येत असून दोन एआरटी केंद्रामार्फत एचआयव्ही बाधित सुमारे चार हजार रुग्णांना औषधोपचार सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. एचआयव्ही बाधित रुग्णांना औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्या गावापासून ते औषधोपचार केंद्रापर्यंत येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून मोफत पास उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात ५९ एचआयव्ही तपासणी केंद्र कार्यरत असून ते पूर्णतः रुग्णसेवेसाठी समर्पित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT