किलिमंजारो शिखरावर ‘यश’ने केले देशभक्तीपर नृत्य
किलिमंजारो शिखरावर ‘यश’ने केले देशभक्तीपर नृत्य sakal
अकोला

किलिमंजारो शिखरावर ‘यश’ने केले देशभक्तीपर नृत्य

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : येथील युवा गिर्यारोहक यश इंगोले याने १५ ऑगस्ट २०२१ रोजी आफ्रिका खंडातील सर्वोच्च किलिमंजारो शिखर गाठले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात तेथे भारतीय तिरंगा फडकविला. यश केवळ किलीमांजारो शिखरावर तिरंगा रोवून थांबला नाही तर, त्याने त्या सर्वोच्च ठिकाणी उणे २५ अंश सेल्सिअस तापमानात ‘केशरी’ या चित्रपटातील देशभक्तीवर आधारित ‘तेरी मिट्टी मे मिल जावा, गुल बनके खील जावा, इतनी सी है दिल की आरजू’ या गाण्यावर १ मिनिट ४५ सेकंद नृत्य केले. या नृत्यातून यशने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याच्या या नृत्याची नोंद ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या संस्थेने घेऊन नव्या विक्रमाबाबतचे प्रमाणपत्र व पदक यशला दिले आहे.

बालपणापासूनच ध्येयवेडा असलेल्या यशने अवघ्या १९ व्या वर्षी किलिमंजारो शिखर सर केले. या शिखरावर चढाई करणारे गिर्यारोहक सर्वोच्च ठिकाणी जास्तीत जास्त २० मिनिटे थांबले आहेत. पण, यशने उणे २५ अंश सेल्सिअस तापमानात तब्बल तीन तासांपेक्षा जास्त वेळ त्या ठिकाणी थांबून दीड मिनिट नृत्य केले. त्याच्या आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद व्हावी, यासाठी यशने हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात रीतसर ई-मेलवर अर्ज केला. अर्जासोबत यशने नृत्य केलेली ध्वनिचित्रफीत, विविध वृत्तपत्रांमध्ये शिखर सर केल्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या, शिखर चढतानाचे विविध फोटो, व्हिडिओ, जिल्ह्यातील वर्ग एकच्या दोन राजपत्रित अधिकाऱ्यांचे पत्र, आफ्रिकन सरकारचे किलिमंजारो शिखर गाठण्याचे पत्र पुरावे म्हणून जोडले. २४ सप्टेंबरला हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने यशच्या जागतिक विक्रमाची नोंद घेऊन संचालकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व पदक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यशला घरपोच पाठविले.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी देखील यशच्या या नव्या विक्रमाबद्दल कौतूक केले. हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने यापूर्वी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे, अभिनेता सोनू सूद, क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू व योगगुरू रामदेवबाबा यांना देखील त्यांनी त्यांच्या क्षेत्रात विक्रमी कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT