Akola Rain News  sakal
अकोला

Akola Rain News : अकोला जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी; नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा

जिल्ह्यात ३० सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या नागपूर येथील वेधशाळेने व्यक्त केली

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात ३० सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या नागपूर येथील वेधशाळेने व्यक्त केली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांनी सतर्क रहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

खरीप हंगामातील मोठ्‍या खंडानंतर ५ सप्टेंबर रोजी रात्री पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली होती. कुठे रिमझिम तर कुठे मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला होता. काही मिनिट झालेल्या या पावसाने कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, काढणीवर आलेल्या सोयाबीनला या पावसाचा कोणताही फायदा झाला नाही.

याआधी २७ जुलै रोजी जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस पडला होता. त्यानंतर एक-दोन ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडाच गेला. श्रावण महिना लागल्यानंतरही पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाला फटका बसला.

जवळपास सर्व मंडळात सोयाबीन उत्पादन घटल्याचा अंदाज आहे. दरम्यान २१ सप्टेंबर रोजी सुद्धा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर हवामान विभागाने २९ व ३० सप्टेंबर रोजी पावसाचा इशारा दिला असून जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT