hack-watsapp-735x400.jpg 
अकोला

हो हे खऱं आहे तुमचेसद्धा व्हाट्सअॅप हॅक होऊ शकते

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः अगदी जलद गतीने संवादाचे माध्यम म्हणून ओळख असलेले व्हाट्सअॅपसुद्धा हॅक होऊ शकते. ऐकून धक्का बसला असणारच. हो पण हे खरे आहे. थोडीशी बेफिकरी तुमचे व्हाट्सअॅप हॅक करू शकते. तेव्हा थोडे सावध रहा आणि व्हाट्सअॅप हॅक होण्यापासून बचाव करा असे आवाहन सायबर अभ्यासकांनी केले आहे.

कोट्यवधीपेक्षा अनेक जण आता व्हाट्सअॅपचे वापरकर्ते आहेत. यामुळे या वापरकर्त्यांची सुरक्षा हा मोठा मुद्दा बनला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार एंड-टू-एंड इनक्रिप्शन सिक्युरिटी वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित ठेवते. मात्र, व्हॉट्सअॅपही हॅक केले जाऊ शकते. हॅकर्सपासून तुमचे व्हॉट्सअॅप कसे सुरक्षित ठेवता येते. त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्यामध्ये व्हॉट्सअॅपच्या वेब पर्यायावर गेल्यास तेथे लॉग आऊटचा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन लॉग आऊट बचनावर क्लिक करावे. यानंतर जेवढ्या ठिकाणी तुमचे व्हॉट्सअॅप खाते सुरु असेल तेथून डिसकनेक्ट होईल.

व्हॉट्सअॅप हॅक होण्यापासून कसे वाचाल?
व्हॉट्सअॅप हॅक होण्यापासून वाचायचे असेल, तर व्हॉट्सअॅप पासवर्ड, पिन किंवा पॅटर्नद्वारे सुरक्षित करावे. तसेच अनोळखी ठिकाणच्या वायफायचा वापर करणेही धोक्याचे आहे. हॅकर्स याद्वारे स्मार्टफोन हॅक करू शकतात.

टू स्टेप व्हेरिफिकेशन फायद्याचे
व्हॉट्सअॅपचे हे फिचर आपल्याला जास्त सुरक्षा पुरविली जाते. याद्वारे व्हॉट्सअॅप खाते हॅक होण्यापासून वाचता येते. याद्वारे सेट केलेला पासवर्ड अधून मधून विचारला जातो. तसेच दुसऱ्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप खाते सुरु केल्यासही आधी पासवर्ड टाकावा लागतो. 

चुकीच्या लिंकवर क्लिक करू नका, अनोळखी ठिकाणी वैयक्तिक माहिती भरू नका, चुकीची किंवा अनोळखी लिंक आली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून ती डिलीट करा.
-
मोहिनी मोडक, सायबर सुरक्षा अभ्यासक, अकोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT