Crab Farming Business Idea sakal
अकोला

Farming Business Idea: खेकडा व्यवसायातून तरुणाने शोधली जगण्याची वाट

खेकड्यांमुळे सुधारला आर्थिक स्त्रोत; दररोज होतो पाच-सहा हजाराचा नफा

अनिल दंदी

बाळापूर : शहर व तालुक्यात सध्या खेकड्यांना मागणी वाढली आहे. शहरातून जाणाऱ्या मन, महेश, भिकूंड नद्यांच्या किनारी, तसेच ओढ्याच्या किनारी खेकडे मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. शेजारील पातूर तालुक्यातही खेकड्यांना मोठी मागणी आहे. (Crab Farming Business Idea)

नेमकं हेच गजानन सुरजुसे या युवकाने ओळखले आणि स्वतःच्या गावात खेकडा व्यवसाय सुरू केला असून या व्यवसायातून तो बऱ्यापैकी उत्पन्न मिळवत आहे. खेकडे आणि खवय्ये यांचे नाते पूर्वापार असून, खेकड्याची विशिष्ट चव आणि आरोग्याच्या दृष्टीने खेकडे महत्त्वाचे असल्याने मासळी बाजारात खेकड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

नेमके हेच हेरून बाळापूर शहरातील गजानन सुरजुसे या उच्चशिक्षित तरुणाने खेकड्यांचा व्यवसाय करण्याचे ठरवले. गजानन सुरजुसे हा तरुण उच्चशिक्षित असून, नोकरीच्या मागे न लागता त्याने स्वतः उभारलेल्या व्यवसायातून जीवनाची आर्थिक वाट शोधली आहे.

मासेमारी करणे हा त्याच्या कुटुंबीयांचा पारंपरिक व्यवसाय आहे, मात्र खवय्यांची खेकड्यांना असलेली मागणी पाहूण या युवकाने स्वतःच्या गावात खेकडा व्यवसाय सुरू केला. त्याच्या खेकड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.

बाळापूर, पातूर तालुक्यात नद्यांचे पात्र आहे. यंदा या परिसरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला, पाण्याबरोबर खेकडे मोठ्या प्रमाणात वाहून आले आहेत. याचा फायदा गजानन या तरुणाला होत आहे. त्याच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत सुधारला आहे.

दिवसभरात पाच ते सहा हजार रुपयांची विक्री

बाळापूर शहरातील बाजारात खेकडे विक्रीसाठी ठेवले जातात. दररोज दहा ते बारा किलोची विक्री होते. यामध्ये किलो मागे ६०० ते ७०० रुपयांची विक्री होते, तर आठवडी बाजाराच्या दिवशी अधिक विक्री होते. या व्यवसायातून दररोज पाच ते सहा हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळत असल्याचे गजानन सांगतो.

मी पदवीधर असून, नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळलो. मासेमारी हा माझ्या कुटुंबीयांचा पारंपरिक व्यवसाय आहे. मासे विक्रीतून जास्त मिळकत होत नाही. खेकड्यांना जास्त मागणी असल्याने मी खेकडा व्यवसाय सुरू केला आहे. यातूनच मी जीवनाची वाट शोधली आहे व मला बऱ्यापैकी फायदा झाला आहे.

- गजानन सुरजुसे, खेकडा व्यवसायीक, बाळापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT