अकोला

रात्रभर विहिरीत राहिला युवक जिवंत; दुसऱ्यादिवशी काढले बाहेर

सकाळ वृत्तसेवा

मानोरा (जि. वाशीम) : तालुक्यातील रामतिर्थ येथील शेतशिवारात असलेल्या विहिरीत युवक दोरीचा सहारा घेत रात्रभर पाण्यात राहून सुद्धा जिवंत होता. स्थानिक युवकांनी त्याला ओढून बाहेर काढले. ही घटना शनिवारी (ता. ४) घडली.

मानोरा तालुक्यातील रामतिर्थ शेतशिवारात असलेल्या ४० फूट खोल विहिरीत जनुना येथील चिंतामण श्यामराव खापरकर (वय ३५) हा युवक थोडा वेडसर असल्यामुळे ३ सप्टेंबर रोजी विहिरीतील पाण्यात उतरला की पडला याची पुसटशी कल्पना देखील कुणाला नव्हती. तो युवक संपूर्ण शरीर पाण्यात सोडून व इलेक्ट्रिक मोटरचा केबल धरून रात्रभर पाण्यात राहिला.

४ सप्टेंबर रोजी सकाळी स्थानिक कैलास नावाचा युवक बकऱ्यांसाठी पाला आणण्यासाठी शेतात गेला असता विहिरीत कुणी तरी बडबड करीत असल्याचा आवाज त्याला आला. त्याने विहिरीत डोकावून पाहले असता युवक आढळला. संपूर्ण शरीर व हात पांढरे फटक झाले होते. कैलासने तत्काळ ही माहिती गावकऱ्यांना दिली.

गावातील युवकांनी कारखेड पोलिस पाटील वासुदेव सोनोने यांना माहिती दिली व तातडीने घटनास्थळी पोहोचले. राजू टाले, नीलेश गावंडे व इतर युवकांनी मिळून विहिरीत अडकून पडलेल्या युवकाला दोराच्या मदतीने बाहेर काढले. चौकशी अंती हा युवक जनुना येथील असल्याचे समजले. तेथील पोलिस पाटील नीलेश ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता युवक चिंतामण खापरकर हा थोडा वेडसर असल्याची पुष्टी मिळाली. रात्रभर हा युवक पाण्यात राहून सुद्धा जिवंत राहल्याने ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT