Agitation Sakal
अकोला

युवक काँग्रेसने चुलीत घातल्या ‘डिग्री’! बेरोजगारीचा निषेध

भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशभरात आज बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. यामुळे युवा वर्गात असंतोष आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशभरात आज बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. यामुळे युवा वर्गात असंतोष आहे. त्याचे परिणाम त्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर होत आहेत. शेतकऱ्यांसह युवकांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. या निषेधार्थ भारतीय युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिन शुक्रवारी (ता.१७) साजरा करण्यात आला. यावेळी युवकांनी पदवीधर पोशाख परिधान करून प्राप्त केलेल्या प्रतिकात्मक पदव्या चुलीत पेटवल्या व मोदी सरकारच्या आर्थिक व रोजगार संबंधित धोरणांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ॲड. महेश गणगणे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून वाढत चालेल्या बेरोजगारीच्या समस्येविरुद्ध अभिनव आंदोलन केले. यावेळी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंशुमन देशमुख, नगरसेवक पराग कांबळे, प्रदेश पदाधिकारी सागर कावरे, कपिल ढोके, उपाध्यक्ष आकाश शिरसाठ, शहर काँग्रेसचे महासचिव कपिल रावदेव, क्रीडा सेलचे जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, शेख अब्दुल्लाह, युवक काँग्रेसचे महासचिव अभिलाष तायडे, विजय जामनिक आदींसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT