Zika Virus esakal
अकोला

Zika Virus : ‘झिका’चा धोका; यंत्रणा अलर्ट; गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका

डेंग्यू आजाराच्या लक्षणांशी समानता असलेल्या झिका विषाणूने राज्यात शिरकाव केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अकोला - डेंग्यू आजाराच्या लक्षणांशी समानता असलेल्या झिका विषाणूने राज्यात शिरकाव केला आहे. पुणे जिल्ह्यात झिकाचे रुग्ण झपाट्याने आढळत असल्याने इतरही ठिकाणी आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. पुण्यामध्ये जून महिन्यात झिका व्हायरसचा पहिला रूग्ण आढळला होता.

त्यानंतर आता पुणे शहरातील झिकाची व्हायरसच्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली असून, त्यामध्ये १० गर्भवती मातांचा समावेश आहेत. त्यामुळे राज्यभरात या व्हायरसबाबत आरोग्य यंत्रणा अलर्ट आहे. अकोला जिल्ह्यात अद्याप एकही झिकाचा रुग्ण नसला तरी नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

झिका विषाणू हा डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखाच डासांपासून पसरणारा फ्लेविव्हायरस आहे. हा प्रामुख्याने संक्रमित एडिस डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांना जास्त धोका असल्याने आरोग्य विभागाने आरोग्य केंद्रांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

झिका प्रभावित गर्भवती आईकडून नवजात बाळाला झिका विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बाळाच्या अविकसित मेंदूवर थेट हल्ला होण्याची भिती असते. राज्यात पुणे, संगमनेर, कोल्हापूर, वाशीम या ठिकाणांवर झिका रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली.

अकोला जिल्ह्यात सध्या १६५ डेंग्यूचे रुग्ण सक्रिय आहेत. डेंग्यू व झिका विषाणूची लक्षणे सारखीच असल्याने अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गर्भवतींसाठी विशेष सूचना

गरोदर मातांची झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने तपासणी करून सतत दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. झिका विषाणू संसर्ग झालेल्या गरोदर महिलांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचे आदेश असून, आरोग्य सुविधा केंद्रांना झिका विषाणू संसर्गासाठी गरोदर महिलांची तपासणी करण्याचे आणि विषाणू संसर्ग झालेल्या मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

अकोला जिल्ह्यात अद्याप एकही झिका विषाणूचा रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे.

- बळीराम गाढवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला

‘झिका’ची लक्षणे

  • हलकासा ताप

  • डोळे लाल होणे आणि सुजणे

  • डोकेदुखी

  • पायांचे गुडघे दुखणे

  • शरीरावर लाल चट्टे येणे

  • शरीरावर पुरळ येणे

उपाययोजना

  • घरात डास होऊ नये म्हणून काळजी घ्या

  • मच्छरदानीचा वापर करा

  • दरवाजे, खिडक्यांना जाळी लावा

  • हलका ताप असल्यास तत्काळ उपचार घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

Satara PNG Gas: साताऱ्यात ऊर्जा क्रांती! ४०० घरांमध्ये पाइप गॅस पोहोचला, १० हजार घरांना मिळणार मोठा दिलासा

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

SCROLL FOR NEXT