Zilla Parishad health workers in Mehkar taluka have given statements for various demands 
अकोला

फूल नको, आम्हाला वेळेवर वेतन द्या; कोरोना योध्दाच वेतनापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा

घाटबोरी (बुलडाणा) : मेहकर तालुक्यामधील जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या संकटात अहोरात्र रुग्णसेवा देत आहे. परंतु, या आरोग्य कोरोना योध्दाचे वेळेवर वेतन मिळत नसल्याने, आरोग्य कर्मचारी संघटनेकडून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांना विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. 

कोरोनाशी २४ तास झुंज देणारे, आरोग्य विभागाचे सर्व जि.प.आरोग्य कर्मचार्‍यांना आता फुलांच्या वर्षावापेक्षा किंवा नुसते थाळी वाजवून कोरोना योद्ध्याचे पोट नाही भरत, तर वेतनदेखील पाहिजे, अशी प्रशासनाला दर महिन्याला आर्त हाक द्यावी लागत आहे. मात्र, ढिम्म प्रशासन यात कुठलाही बदल करीत नसल्याचे चित्र आहे. कर्मचार्‍यांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे दरमहा होणारे वेतन. तेच जर उशिराने होत असेल तर मग घरातील प्रपंच कसा चालेल, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. जिल्हा परिषद किंवा अन्य शासकीय कर्मचार्‍यांचे वेळेवर वेतन होते. मात्र, आरोग्य विभागावर अन्याय का? असाही प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. 

निवेदनात, वेतन प्रत्येक महिन्याचे एक तारखेला देण्यात यावे तसेच नियमित व कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचे वेतन नियमित होत नाही. कोविड केअर सेंटर सीसीसी करिता संपूर्ण स्टाफ एएनएम सहित नव्याने भरण्यात यावा व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका यांच्या ड्यूटी लावण्यात येऊ नये तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राचे ठिकाणी एनएचएम अंतर्गत स्टाफ नर्स आणि एलएचव्ही पद तात्काळ भरण्यात यावे, लसीकरण करिता ज्या ठिकाणी एएनएमची संख्या कमी आहे.

त्या ठिकाणी रोजंदारीवर एएनएम यांची नेमणूक करण्यात यावी, कोविड लसीकरण बूथवर ड्राय रनमध्ये करवून घेतलेल्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण जिल्हाभर बूथवर लसीकरण लाभार्थ्यांचे आयडीकार्ड व्हेरिफिकेशन, व्हेरिफिकेशन इन कोविन अ‍ॅप्लिकेशन, व्हॅक्सिनेशन, अफ्टर व्हॅक्सिनेशन ऑब्झर्वेशन, बूथ मॅनेजमेंट अधिकारी अशाप्रकारे पाच-पाच लोकांच्या ड्यूटी लावण्यात यावेत. आरोग्य सेवा कर्मचारी किंवा त्याचे कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह आले तर सीसीसीला त्यांच्यासाठी बेड आरक्षित ठेवण्यात यावे आदी मागणी संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांना निवेदन देण्यात आले आहे. 

यावेळी मेहकर येथील संघटनेचे पदाधिकारी, कोषध्यक्ष शेषराव पर्‍हाड, प्रसिद्धी प्रमुख रवींद्र साठे, संघटक वसंत वायाळ, सचिव योगेश देशमुख, श्री काकडे, दादाराव डाबेराव, राजू चांगाडे, सुनील जाधव, अरुणा दाभाडे आदी उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता दोन मिनिटांत दाखल होईल FIR, नागपूर पोलिसांनी AI च्या मदतीने विकसीत केली नवी प्रणाली..

Mumbai News: पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी? विरोधकांचा न्यायालयात युक्तिवाद

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

Nashik Gram Panchayat : सरपंच प्रशासकांना आर्थिक 'पॉवर' आहे का? नाशिकमधील ५८४ ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

SCROLL FOR NEXT