akola crime Sakal
अकोला

Akola Crime : जि. प. च्या शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार; आरोपी अद्यापही फरार

विनयभंग केल्यानंतर कुणाला सांगितले तर मार खाशील असा दमही त्याने चिमुकलीला दिला होता. या घटनेनंतर मुलगी भयभीत झाली होती. त्यामुळे सलग दोन दिवस ती शाळेत गेली नाही. शाळेत जात नसल्यामुळे घरच्यांनी तिला विचारणा केली.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहरापासून काही अंतरावर असलेल्या गुडधी येथे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक शाळेत नऊ वर्षीय चिमुकलीवर शालेय पोषण आहार बनवणाऱ्या ५२ वर्षीय कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सिव्हील लाईन पोलिस स्टेशनअंतर्गत घडली. याघटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहार तयार केला जातो. ४ जुलैरोजी दुपारी शालेय पोषण आहार मदतणीस चंद्रमणी चव्हाण याने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा गुडधी येथे ५२ वर्षीय शालेय पोषण आहार बनवणाऱ्या कर्मचाऱ्याने शाळेतील ९ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. त्याच्याविरुद्ध बाल संरक्षण कायद्याअंतर्गत ३८४/२०२४ कलम ७४,७५ भा.न्या.स. २०२३, सहकलम ७, ८ पोस्को ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभंग केल्यानंतर कुणाला सांगितले तर मार खाशील असा दमही त्याने चिमुकलीला दिला होता. या घटनेनंतर मुलगी भयभीत झाली होती. त्यामुळे सलग दोन दिवस ती शाळेत गेली नाही. शाळेत जात नसल्यामुळे घरच्यांनी तिला विचारणा केली.

घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला. त्यानंतर प्रकरणाची उकल झाली. तीचे पालक जिल्हा परिषद शाळेत पोहचून जाब विचारू लागले. तेवढ्यात चंद्रमणी चव्हाण हे शाळेच्या भिंतीवरून उडी मारून पळाले. सद्यस्थितीत या प्रकरणात सिव्हील लाईन पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

अहवाल तयार

जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी देखील या संदर्भात एक अहवाल तयार करून जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवलाय अशी माहिती जिल्हा परिषद शाळा, गुडधी चे प्रभारी मुख्याध्यापक निलेश देशमुख यांनी दिली.

अत्याचाराच्या घटनांत वाढ

गत ६ महिन्यांपासून शहरात विनयभंगाच्या घटनात वाढ झाली आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील एका महिन्यापूर्वी अकोल्यात एका प्रतिष्ठीत महाविद्यालयाच्या वसतीगृहात अत्याचार झाल्याची घटना घडली होती. त्यातील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahua Moitra: तुम्ही इतके स्वस्त आहात का? आमच्या लोकांना ४ कोटी आगाऊ अन् दरमहा १ कोटी; ठाकरेंच्या खासदारांना सवाल!

Monorail: मोनोरेल सुरू होणार पण प्रवाशांच्या खिशाला कात्री, तिकीटांच्या किंमती वाढणार? नवे दर किती आणि कधीपासून लागू?

लग्न होऊनही 5 वर्षांपासून लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहतेय रसिका सुनील, नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...

Latest Marathi News Live Update : इम्तियाज जलील यांच्या विधानाला ठाकरे गटाचा पाठिंबा, देशात हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप

Kolhapur Water Crisis: कोल्हापुरात पाणीबाणी, एकाच वेळी सर्व योजना बंद पडण्याची इतिहासात पहिलीच घटना; भोगावती, पंचगंगेच्या पातळीत मोठी घट

SCROLL FOR NEXT