Reliance AGM : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) सोमवारी संपन्न झाली. या बैठकीत कंपनीने काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. आज आपण बैठकीतील 10 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या सर्व ग्राहकांना माहिती असणं गरजेचं आहे.
1. Jio ची 5G सेवा दिवाळीपासून सुरू होणार
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी बैठकीमध्ये Jio 5G नेटवर्कवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले. ते म्हणाले की, यावर्षी दिवाळीला देशातील महानगरांसह अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G नेटवर्क सुविधा मिळण्यास सुरुवात होईल आणि डिसेंबर 2023 पर्यंत जिओची 5G सेवा देशातील सर्व तालुका आणि तहसील स्तरावर पोहोचेल.
2. रिलायन्स रिटेल यावर्षी सुरू करणार FMCG व्यवसाय
एजीएममध्ये, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या (RRVL) संचालिका ईशा अंबानी यांनी घोषणा केली की, रिलायन्स रिटेल यावर्षी FMCG व्यवसाय सुरू करेल. प्रत्येक भारतीयाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी उच्च दर्जाच्या स्वस्त उत्पादनांचे उत्पादन आणि वितरण करेल, असेही त्या म्हणाल्या.
3. दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
मुकेश अंबानी म्हणाले की, जिओ पॅन इंडिया 5G नेटवर्कसाठी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, याचे नेटवर्क क्वांटम सिक्युरिटी सारख्या प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल. याशिवाय जिओ स्मार्ट सेन्सरदेखील लॉन्च करण्यात येणार असून, जे 5G नेटवर्कच्या आधारे इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि चौथी औद्योगिक क्रांती यांसारख्या मोहिमांना आणखी आघाडीवर नेण्यास फायदेशीर ठरेल.
4. WhatsApp सोबत भागीदारी
इशा अंबानी यांनी WhatsApp-JioMart भागीदारीची घोषणा करताना सांगितले की, JioMart आणि WhatsApp यांच्या भागीदारीमुळे व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. JioMart-WhatsApp वापरकर्ते WhatsApp पे, कॅश ऑन डिलिव्हरी आणि इतर पेमेंट पद्धती वापरू शकणार आहेत.
5. 2.32 लाख नोकऱ्या
रिलायन्स इंडस्ट्रीजने प्रत्येक क्षेत्रात आपले काम वाढवले आहे. त्यामुळेच निर्यात 75 टक्क्यांनी वाढून 2,50,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मुकेश अंबानी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, रिलायन्सने आर्थिक वर्ष 22 मध्ये 2.32 लाख नोकऱ्या दिल्या आहेत. रिलायन्सने समाजाची सेवा करण्यासाठी उच्च मापदंड स्थापित केले आहेत. यासोबतच व्यवसाय आणि सामाजिक मूल्येही मोठ्या प्रमाणावर निर्माण केली आहेत.
6. न्यू एनर्जी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 75,000 कोटींची गुंतवणूक
रिलायंस इंडस्ट्रीज न्यू एनर्जीमधील गुंतवणूक दुप्पट करण्याचे आश्वासन पूर्ण करेल. मुकेश अंबानी म्हणाले की, “रिलायन्सला जामनगर स्थित न्यू एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टममध्ये ७५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे वचन लवकरच पूर्ण करायचे आहे. कंपनीला 2025 पर्यंत 20 GW सौर ऊर्जा निर्मिती क्षमता बसवायची असून, ग्रीन हायड्रोजनची उर्जा आणि उर्जा आवश्यकता पूर्ण करण्यास हे सक्षम असेल.
7. रिलायन्सच्या महसूलात 47 टक्के वाढ
मुकेश अंबानी म्हणाले की, 'आमची कंपनी भारतातील पहिली कॉर्पोरेट बनली आहे जिने वार्षिक महसूल 100 डॉलर अब्ज पार केला आहे. रिलायन्सचा एकत्रित महसूल 47% वाढून रु. 7.93 लाख कोटी किंवा 104.6 अब्ज झाला आहे. रिलायन्सच्या वार्षिक EBITDA ने 1.25 लाख कोटींचे महत्त्वपूर्ण लक्ष्य ओलांडले आहे.
8. भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र असेल
मुकेश अंबानी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणात पंच-प्राण आणि पाच अत्यावश्यक गोष्टींबद्दल भाष्य केले होते. जे निश्चितपणे 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवेल. भारतीयांची पुढची पिढी स्वातंत्र्यानंतरच्या पिढ्यांनी एकत्रितपणे जे काही साध्य केले आहे त्यापेक्षा बरेच काही साध्य करण्यासाठी तयार असून, रिलायन्स भारताच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी पूर्वीपेक्षा अधिक योगदान देण्यास तयार आहे.
9. JioCloud PC ची घोषणा
एजीएममध्ये अल्ट्रा-स्पीड 5G इंटरनेट एकाच उपकरणाची घोषणा करण्यात आली. याद्वारे घर आणि कार्यालयात कुठेही इंटरनेटचा वापर शक्य आहे. या उपकरणाला Jio AIRFIBER असे नाव देण्यात आले असून, कंपनीने JioCloud PC ची देखील घोषणा केली आहे. हा एक परवडणारा क्लाउड कनेक्टेड पीसी असेल. जो विद्यार्थी आणि लघु उद्योगांसाठी गेम चेंजर ठरेल.
10. ईशा अंबानी आणि अनंत अंबानींनी संभाळली कमान
एजीएममध्ये मुकेश अंबानी यांनी त्यांची मुलगी ईशा अंबानी आणि धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्याकडे नवीन जबाबदाऱ्या सोपवण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, ईशा अंबानी रिलायन्स रिटेलच्या प्रमुख म्हणून काम करतील, तर अनंत अंबानी न्यू एनर्जीचा व्यवसाय संभाळणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.