IPO Sakal media
अर्थविश्व

Paytm मुळे बुडलेले पैसे भरून काढायचेत? डिसेंबरमध्ये 10 IPO चा धडाका!

ओमकार वाबळे

यावर्षी शेअर मार्केटमध्ये मोठी आर्थिक घुसळण पाहायला मिळत आहे. दशकातील सर्वाधिक आयपीओ यावर्षात लिस्ट झाल्याने बाजारात सतत चढ-उतार सुरू आहेत. 2021 वर्ष संपायला अजून एक महिना बाकी आहे. मात्र, बाजारात अनेक कंपन्या पैसे लावणार आहेत. तसेच गुंतवणुकीच्याही मोठ्या संधी महिनाभरात उपलब्ध होऊ शकतात. देशातील सर्वात मोठा आयपीओ Paytmने गुंतवणूकदारांची निराशा केली. दोन दिवसांत जवळपास 6 हजार 500 कोटींचं आर्थिक नुकसान झालं. आता पेटीएम पुन्हा काही प्रमाणात वधारत आहे. मात्र, तुमची बुडालेली गुंतवणूक भरून काढू शकता.

एकामागून एक, अनेक कंपन्या बाजारात IPO आणत आहेत. अलीकडेच, देशातील बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने IPO द्वारे निधी उभारण्यासाठी 10 कंपन्यांना मान्यता दिली आहे. या कंपन्यांनी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान सेबीकडे आयपीओशी संबंधित कागदपत्रे सादर केली होती. त्यांना 22-26 नोव्हेंबर दरम्यान SEBI कडून IPO साठी 'निरीक्षण पत्र' प्राप्त झाले. या कंपन्यांचे शेअर्स BSE आणि NSE वर लिस्ट केले जातील.

या 10 कंपन्यांचे IPO येणार?

जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया, डिफेन्स सप्लायर कंपनी डेटा पॅटर्न (इंडिया) लिमिटेड, डिजिटल मॅपिंग कंपनी मॅप माय इंडिया, एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीज, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया, इंडिया1 पेमेंट्स, हेल्थियम मेडटेक, व्हीएलसीसी हेल्थ केअर, मेट्रो ब्रँड आणि गोदावरी बायोरिफायनरीज.

या आठवड्यात स्टार हेल्थ आणि टेगा इंडस्ट्रीजचा IPO

या आठवड्यात स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी आणि तेगा इंडस्ट्रीज त्यांचे IPO आणणार आहेत. याद्वारे 7,868 कोटी रुपये उभारण्याची त्यांची योजना आहे. स्टार हेल्थचा IPO 30 नोव्हेंबरला उघडेल आणि 2 डिसेंबरला बंद होईल. त्याच वेळी, तेगा इंडस्ट्रीजचा IPO 1 डिसेंबरला उघडेल आणि 3 डिसेंबरला बंद होईल.

आनंद राठी वेल्थचा IPO 2 डिसेंबरला उघडणार

आनंद राठी वेल्थ या मुंबईस्थित वित्तीय सेवा कंपनीचे आनंद राठी यांचा IPO 2 डिसेंबर रोजी उघडणार आहे. कंपनीने 660 कोटी रुपयांच्या IPO साठी प्रति शेअर 530-550 रुपये किंमत श्रेणी निश्चित केली आहे. मंगळवारी ही माहिती देताना कंपनीने सांगितलं की, तीन दिवसांचा असणारा हा IPO 6 डिसेंबरला बंद होईल.

स्नॅपडील आयपीओ (Snapdeal IPO)

स्नॅपडील पुढील काही आठवड्यात SEBI कडे IPO अर्ज दाखल करू शकते. भारतातील ऑनलाइन रिटेलर Snapdeal, SoftBank Group आणि Alibaba Group च्या गुंतवणुकीसह, IPO लाँच करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी येत्या काही आठवड्यांमध्ये $250 दशलक्षच्या IPO साठी SEBI मध्ये आपले पेपर दाखल करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT