अर्थविश्व

गृहनिर्माण फायनान्ससाठी योग्य संस्था कोणती? फॉलो करा १० स्मार्ट टिप्स

शरयू काकडे

- गौरव मोहता

तुमच्यासाठी हा विषय सोपा करण्याचा मी प्रयत्न करतो. खाली सूचीबद्ध केलेल्या काही गोष्टी साध्यासुध्या वाटतील पण नेहमी मूलभूत गोष्टींवरून सुरवात करून नंतर तपशील समजून घेणे चांगले असते.

तुम्हाला कर्ज देणाऱ्या संस्थेवर तुम्ही विश्वास ठेवू शकता का?

जसे तुम्ही मित्रांची निवड काळजीपूर्वक करता, त्यांचे वर्तन, सवयी, कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी समजून घेता त्याचप्रमाणे तुम्हाला कर्ज देणाऱ्या संस्थेची प्रतिष्ठा जाणून घेणे महत्वाचे आहे. तुमच्या आणि कर्ज देणाऱ्या संस्थेमध्ये हा एक दीर्घकालीन संबंध आहे. तर, हे तपशील नक्की तपासा. ते व्यवसायात किती काळ आहेत? ते नैतिक आणि व्यावसायिक म्हणून ओळखले जातात का? साधारणतः कुठल्या प्रकारच्या ग्राहकांना सेवा पुरवतात? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कर्ज पुरवठादारांची सटीक यादी तयार करण्यात मदत करतील.

तुमची कर्ज पात्रता काय आहे? नेहमी लागू असणारा नियम

हाऊसिंग फिनान्स कंपन्या (HFC) आणि नॉन बँकिंग फिनान्स कंपन्यांचे (NBFC) पात्रता निकष हे पारंपारिक बँकांच्या पात्रता निकषांपेक्षा ज्यास्त लवचिक असतात. एखादी पारंपरिक बँक फक्त तुमच्या उत्पन्नाचे पुरावे पाहते आणि कर्ज पात्रता ठरवते, तर इतर कंपन्या तुमची परतफेड क्षमता समजून घेण्यासाठी तुमच्या राहणीमानाची परिस्थिती, पगारा व्यतिरिक्तचे उत्पन्न, आगामी खर्च इत्यादींची तपशीलवार माहिती गोळा करू शकतात. अधिक कसून केलेले मूल्यांकन तुम्हाला उच्च एलटीव्हीसह अधिक चांगल्या कर्जासाठी पात्र करण्यात मदत करेल. तुम्ही इंटरनेट वर तुमच्या कर्जाच्या पात्रते बद्दल मोफत तपासू शकता, जे तुम्हाला औपचारिकपणे अर्ज करण्यापूर्वी पात्रतेची योग्य कल्पना देखील देईल.

व्याज दर काय आहे? 

याच्याबद्दल समजायला जास्त बुद्धी वापरावी लागणार नाही. तुम्ही हा कर्ज देणाऱ्याचा निवडणूक जाहीरनामा समजू शकता आणि जाहीरनाम्याप्रमाणेच कदाचित संपूर्ण माहिती दिली जात नाही. जरी तुम्ही कमी व्याज दराला प्राधान्य देत असाल तरी कर्जाच्या मुदतीच्या शेवटी तुम्ही एकूण किती व्याज भरत आहात याचा हिशोब लावून लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे, प्रस्तावित केलेले दर फ्लोटिंग किंवा फिक्स्ड आहेत हे नीट समजून घ्या. साधारणतः कमी होणारा फ्लोटिंग रेट आपल्या फायद्याचा असतो.

तुम्ही सहजपणे प्रीपेमेंट करू शकता का? कोणत्याही कर्जाचे मूलमंत्र (याच्या बद्दल मनात खूणगाठ बांधा)  

कार्यकाळ जितका जास्त तितके जास्त व्याज आकारले जाईल! तुम्हाला किती व्याज दर दिला गेला आहे हे महत्त्वाचे नाही, जर कर्जाचा कालावधी जास्त असेल तर तुम्हाला भरावे लागणारे व्यास सुद्धा जास्त असण्याची शक्यता आहे! पैसे वाचवण्याचा सर्वात हुशार मार्ग म्हणजे आपल्या कर्जाची पूर्ण परतफेड, लहान परंतु नियमित पूर्व पेमेंटद्वारे किंवा एकरकमी रक्कम प्रीपेमेंट म्हणून लवकरात लवकर करणे. कर्ज घेताना तुमच्या गृहकर्जासाठी प्रीपेमेंटचा पर्याय तुमच्याकडे असल्याची खात्री करा. बहुतेक बँका प्रीपेमेंटला प्रोत्साहन देत नाहीत, कारण त्यात त्यांचं नुकसान होतं.

कर्ज देणारे शुल्काच्या संरचनेबाबत पारदर्शक आहेत का? 

कर्जाच्या संपूर्ण कालावधीत तुमच्याकडून आकारले जाणारे प्रक्रिया शुल्क, लीगल आणि तांत्रिक शुल्क, गहाणखती शुल्क, फोरक्लोजर शुल्क इत्यादी सारखे सर्व प्रकारचे शुल्क कर्ज देणाऱ्याकडून लेखी घ्या. तुम्ही कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी निश्चितपणे याबद्दल विचारले पाहिजे आणि जास्तीत जास्त स्पष्टता मिळवली पाहिजे.

तुम्हाला डिजिटल सुविधा मिळत आहेत का? 

बहुतेक कंपन्या त्यांच्या ग्राहकांच्या सोयीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत, जी आजकाल एक मूलभूत ऑफर बनली आहे. तुम्हाला गृहकर्जासाठी सहजपणे अर्ज करण्याची सुविधा असावी आणि नंतर मोबाइल ऍपपवरून आपल्या अर्जाबद्दल तपासणी करण्याची सुविधासुद्धा असली पाहिजे. हफ्ता भरणे, अकाउंट स्टेटमेंट मिळवणे किंवा  ऍपवरून प्रश्न विचारणे यासारखी कामं करण्याच्या सुविधा असणे आवश्यक आहे!

कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ आहे का? 

साधारणतः कर्ज देणाऱ्या सर्व संस्थांमध्ये कर्जाच्या प्रक्रियेत सामील औपचारिकता आणि लागणारी कागदपत्रे एक सारखी असतात. तरी, कर्ज मंजुरी मिळण्यासाठी लागणारा वेळ मात्र काही महिन्यानी कमी-जास्त असू शकतो. सहसा तथाकथित "साधे दस्तऐवजीकरण" इतके साधे किंवा सोपे नसते! अशी कर्ज देणारी संस्था निवडा जी स्वतःच्या प्रक्रियेच्या गतीवर अभिमान बाळगते. सर्व आवश्यकता एकाच वेळी विचारा आणि मग कागदपत्रे एकत्र करण्यास सुरवात करा किंवा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या कागदपत्रांपेक्षा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या संस्थेकडे जाऊ शकता.

तुम्हाला संपर्कासाठी एका विशिष्ट अधिकाऱ्याची/व्यक्तीची नेमणूक होते का? 

तुम्हाला कर्ज देणारी संस्था तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम असली पाहिजे आणि तुमच्या सुविधेसाठी त्यांनी त्यांच्यातर्फे एका विशिष्ट अधिकाऱ्याची/व्यक्तीची नेमणूक केली पाहिजे.

तुमची गहाण ठेवलेली कागदपत्रे सुरक्षित आहेत का? 

तुम्ही गहाण ठेवलेली कागदपत्रे तुमच्या घरावरचा तुमचा हक्क सिद्ध करतात. नाहीतर कर्ज देणाऱ्या संस्थेऐवजी भारतीय सैन्याकडून ते संरक्षित केलेलं बरे! कर्ज देणाऱ्या संस्थेकडून तुमची कागपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी ते काय खबरदारी घेतात याबद्दल विचारा म्हणजे कर्जाची मुदत संपल्यानंतर कागदपत्रे परत मिळवणे तुमच्यासाठी डोकेदुखीचे काम होणार नाही. कागदपत्रे त्या संस्थेने तिजोरीत ठेवणे हा सर्वात आदर्श उपाय आहे!

तुम्ही गृहकर्ज विमा घेत आहात का? 

शेवटचा पण तितकाच महत्वाचा मुद्दा. कृपया कोणत्याही प्रकारच्या अनपेक्षित परिस्थितीपासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करा. तुमचे गृहकर्ज भरण्यासाठी विमा हा महत्वाचा सुरक्षित मार्ग आहे. म्हणून, नेहमी विमा घेण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे तुमचे थकित दायित्व सुरक्षित होते आणि तुमच्या कुटुंबाचे सुरक्षित भविष्य आणि त्यांच्या डोक्यावर छत सुनिश्चित होते.

आता तुमच्याकडे तयार यादी आहे, हा लेख हाताशी ठेवा ज्यामुळे तुमच्या घर खरेदीच्या प्रवासात तुम्हाला नक्कीच मदत होईल. आणि हो, आपल्या गृह्प्रवेशाला आमंत्रण मिळाले तर खूप आनंद होईल! चला, भेटूया कधीतरी …

( लेखक चीफ मार्केटिंग ऑफिसर, होमफर्स्ट फायनान्स कंपनी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT