Petrol-Diesel Prices Today 2 April 2022 esakal
अर्थविश्व

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल-डिझेल 80 पैशांनी पुन्हा महागलं

सकाळ डिजिटल टीम

देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळं लोक हैराण झालेत.

Petrol-Diesel Prices Today 2 April 2022 : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळं (Petrol Diesel Hike Today) लोक हैराण झालेत. वाहनांच्या इंधनावरील महागाईचा परिणाम कमी होण्याचं नाव घेत नाहीय. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी (Indian Oil Marketing Companies) 1 एप्रिल रोजी केवळ एका दिवसाच्या दिलासानंतर आज (शनिवार) 2 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनाच्या किमतीत प्रति लिटर 80-80 पैशांनी वाढ केलीय.

भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOCL) ताज्या अपडेटनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) एक लिटर पेट्रोलची किंमत 102.61 वर गेलीय. त्याचवेळी डिझेलचा दर 93.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय. 31 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांची वाढ झाली होती. दरम्यान, 12 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 10 वेळा वाढल्या आहेत.

देशातील चार महानगरांची तुलना केल्यास मुंबईत (Mumbai) पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे.

दिल्ली

पेट्रोल - 102.61 रुपये प्रति लिटर

डिझेल - 93.87 रुपये प्रति लिटर

मुंबई

पेट्रोल - 117.57 रुपये प्रति लिटर

डिझेल - 101.79 रुपये प्रति लिटर

कोलकाता

पेट्रोल - 112.19 रुपये प्रति लिटर

डिझेल - 97.02 रुपये प्रति लिटर

22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून आत्तापर्यंत 24 मार्च आणि 1 एप्रिल असे एकूण दोन दिवस वगळता दर दिवसेंदिवस वाढत आहेत. 2 एप्रिलच्या वाढीसह एकूण 10 दिवसांत पेट्रोल 7 रुपये 20 पैशांनी महागलं आहे. 22 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत म्हणजेच, एकूण 12 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 10 वेळा वाढल्या आहेत.

कोणत्या दिवशी किती किंमत वाढली?

22 मार्च - 80 पैसे

23 मार्च - 80 पैसे

मार्च 25- 80 पैसे

26 मार्च - 80 पैसे

27 मार्च - 50 पैसे

मार्च 28 - 30 पैसे

मार्च 29- 80 पैसे

मार्च 30- 80 पैसे

मार्च 31- 80 पैसे

2 एप्रिल - 80 पैसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Diesel Rules : डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

MLC Election: विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव! शिंदेंनंतर संकटमोचक महाजन दिल्लीला रवाना; कोणत्या जागेवर पेच वाढला?

KKR vs DC: KL Rahul बरसला! अखेरच्या सामन्यात दिल्लीचे कोलकातासमोर मोठे लक्ष्य; पण शेवट गोड कोण करणार?

CSR Initiative: भारत फोर्जच्या सामाजिक उत्तरदायित्वातून कोळवाडी-कोटमदरा गावात पाझर तलावांचे खोलीकरण

Solar Power Project : गणेशवाडी उपकेंद्रात ९ मेगावॉट सौर प्रकल्प कार्यान्वित; गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीजपुरवठा

SCROLL FOR NEXT