SIP GOOGLE
अर्थविश्व

5 वर्षांत 2 कोटी रुपये, एसआयपीमध्ये अशी करा गुंतवणूक...

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एकरकमी आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) करता येते.

नमिता धुरी

मुंबई : म्युच्युअल फंड गुंतवणूकीत तुम्ही लाँग टर्ममध्ये मोठा फंड तयार करु शकता. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी लाँग टर्ममध्ये 12 ते 15 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एकरकमी आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) करता येते. जर तुम्हाला 15 वर्षात 2 कोटी रुपये जमवायचे असतील तर SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्हाला दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल  ते जाणून घेऊयात.

- दर महिन्याला 40,000 रुपये गुंतवल्यास आणि ते 15 वर्ष ही गुंतवणूक अशीच ठेवल्यास तुम्ही सहजपणे 2,01,83,040 रुपयांचा कॉर्पस तयार करू शकता.

- अंदाजे वार्षिक परतावा  12% आहे, जो यापेक्षाही जास्त असू शकतो.

SIP कॅल्क्युलेटर: गुंतवणूक 72 लाख, नफा 1.29 कोटी

तुम्ही 15 वर्षांसाठी SIP मध्ये महिन्याला 40,000 रुपये गुंतवले असतील, तर तुम्हाला सुमारे 1.29 कोटी रुपयांचा फायदा होतो. यात तुमची गुंतवणूक फक्त 72 लाख रुपये असेल.

पण, 12% अंदाजे परतावा आहे, तो यापेक्षा जास्त असू शकतो किंवा कमीही असू शकतो. बाजारातील अस्थिरता म्युच्युअल फंड्सच्या कामगिरीवर परिणाम करू शकते.

म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक लवकरात लवकर सुरू करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण, यामुळे तुम्हाला लॉन्‍ग टर्मपर्यंत रिटर्न बेनेफिट मिळतो. समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 40,000 रुपयांची SIP सुरू केली, तर वयाच्या 40 व्या वर्षी तुमच्याकडे 2 कोटी रुपये असतील.

एसआयपी ही गुंतवणुकीची सिस्‍टमॅटिक पद्धत आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला थेट बाजाराच्या जोखमीला सामोरे जावे लागत नाही. त्याच वेळी, परतावाही जास्त आहे. पण, यामध्येही धोका आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराने त्याचे उत्पन्न, टारगेट आणि रिस्‍क प्रोफाइल पाहूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT