अर्थविश्व

"एनएसई' इमर्ज मंचावर 200 व्या कंपनीची नोंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) इमर्ज व्यासपीठावर 200 व्या कंपनीची नोंदणी करण्यात आली. गुरुवारी (ता.22) केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, तसेच भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि "एनएसई'चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यावेळी उपस्थित होते.

मागील सात वर्षांत या मंचावर तीन हजार 136 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. सूचिबद्ध लघु व मध्यम कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल हे 8 हजार 800 कोटी आहे. 22 एसएमई कंपन्यांनी मुख्य एनएसई बाजारमंचावर स्थलांतर करण्याइतकी प्रगती साधली आहे. 

एनएसई इमर्ज एसएमई बाजारमंचावर सूचिबद्ध झालेली "वंडर फायब्रोमॅट्‌स लिमिटेड' ही 200 वी कंपनी ठरली. मध्य भारत ऍग्रो प्रॉडक्‍ट्‌स लिमिटेड आणि कृष्णा फॉसकेम लिमिटेड या दोन कंपन्यांच्या समभागांचे व्यवहार आज एसएमई व्यासपीठावरून मुख्य एनएसई बाजारमंचावर स्थलांतरित झाले आहेत. "एमएसएमई' क्षेत्राचा देशाच्या जीडीपीमध्ये 29 टक्के वाटा असून पुढील पाच वर्षांत तो आम्ही 50 टक्‍क्‍यांवर नेणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

लघु आणि मध्यम उद्योगांचे सशक्तीकरण आणि त्यांच्या पाठबळासाठी एनएसई प्रयत्नशील आहे. पारंपरिक निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांपासून ते नवीन अर्थव्यवस्थेतील स्टार्ट-अप्स अशा सर्वांसाठी "एनएसई'ने नेहमीच दमदार भांडवल उभारणीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न राखला असल्याचे "एनएसई'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT