अर्थविश्व

स्टेट बँकेकडून मिळवा 5 लिटर पेट्रोल 'फ्री'

वृत्तसंस्था

मुंबई: डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी स्टेट बँकेने (एसबीआय) 5 लिटर पेट्रोल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त अट आहे की, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पंपावरुन पेट्रोल भरल्यास ग्राहकांना 5 लिटर पेट्रोल मोफत मिळेल आणि त्यासाठी पैसे देताना ‘भीम’ अॅपचा वापर करायचा असून ते एसबीआयच्या खात्यातून करणे गरजेचे आहे. ही ऑफर येत्या 23 नोव्हेंबर 2018 पर्यंतच वैध असणार आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पंपावरुन पेट्रोल भरताना भीम अॅपद्वारे एसबीआयच्या खात्यातून व्यवहार केला तरच 5 लिटर पेट्रोल मोफत मिळू शकणार आहे, अशी माहिती एसबीआयच्या वेबसाईटवर दिली आहे. मात्र काही अटी देखील बँकेकडून ठेवण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे किमान 100 रुपयांचे पेट्रोल भरावे लागेल. त्यानंतर भीम अॅपद्वारे केलेल्या या 100 रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा नंबर लिहून 9222222084 या नंबरवर एसएमएस करावा लागणार आहे. (भीम अ‍ॅपद्वारे पेमेंट केल्यानंतर पेमेंट नंबर <UPI Reference No. (12-Digit)> <DDMM> टाईप करून 9222222084 या फोन नंबरवर SMS पाठवा लागणार आहे. शिवाय या SMSसाठी शुल्क भरावे लागेल. शिवाय तुमचा नंबर निवडण्यात आला तर तुमच्या मोबाइक क्रमांकावर मेसेजद्वारे सांगण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT