Gold sakal
अर्थविश्व

Gold : देशाच्या सोने आयातीत वार्षिक ७९ टक्के घट

देशातील डिसेंबरमधील सोन्याची आयात वार्षिक तुलनेत ७९ टक्क्यांनी घटली असून, गेल्या दोन दशकातील ही मासिक नीचांकी आयात आहे.

सकाळ वृत्तसेवा

देशातील डिसेंबरमधील सोन्याची आयात वार्षिक तुलनेत ७९ टक्क्यांनी घटली असून, गेल्या दोन दशकातील ही मासिक नीचांकी आयात आहे.

मुंबई - देशातील डिसेंबरमधील सोन्याची आयात वार्षिक तुलनेत ७९ टक्क्यांनी घटली असून, गेल्या दोन दशकातील ही मासिक नीचांकी आयात आहे. स्थानिक बाजारपेठांमध्ये सोन्याच्या भावाने उच्चांक गाठल्याने मागणी कमी झाली आहे, त्यामुळे आयातही कमी झाली असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

जगातील दुसरा सर्वांत मोठा सोने आयातदार देश असलेल्या भारताने कमी सोने आयात केल्याने जागतिक व्यापारावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः सोने व्यापारातील नफ्याने आठ महिन्यांतील सर्वोच्च पातळी गाठलेली असताना आयात घटल्याने त्याला मर्यादा येऊ शकते. सोने आयात कमी झाल्याने देशाची व्यापारी तूटही कमी होऊ शकते आणि रुपयालाही पाठबळ मिळू शकते.

भारताने डिसेंबरमध्ये २० टन सोने आयात केले. एका वर्षापूर्वी याच महिन्यात ९५ टन सोने आयात करण्यात आले होते, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. मूल्याच्या दृष्टीने, डिसेंबर २०२२मध्ये आयात केलेल्या सोन्याचे मूल्य आयात १.१८अब्ज डॉलर आहे, जे एका वर्षापूर्वी याच महिन्यात ४.७३ अब्ज डॉलर होते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. कॅलेंडर वर्ष २०२२ मध्ये देशातील सोन्याची एकूण आयात ७०६ टन इतकी आहे. वर्ष २०२१ मध्ये ती १०६८ टन होती, असेही सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT