7th pay commission Marathi News Team eSakal
अर्थविश्व

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत

केंद्र सरकारच्या 31 लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होऊ शकतो.

सुधीर काकडे

केंद्र सरकारच्या (Central Government) 31 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यामध्ये (Dearness Allowance) करण्यात आलेल्या वाढीनंतर आता या कर्मचाऱ्यांचा घर भाडे (House Rent Allowance) देखील वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही भेट जाहीर करू शकतं.

HRA ची सध्याची स्थिती काय?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या श्रेणीनुसार 9 टक्के, 18 टक्के आणि 27 टक्के दराने HRA मिळतो. सरकार या भत्त्यामध्ये आता ३ टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते, अशी माहिती मिळाली आहे. या वाढीनंतर एचआरएचे दर 10 टक्के, 20 टक्के आणि 30 टक्के होतील. अशा प्रकारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान एचआरए १० टक्क्यांवर पोहोचेल.

केंद्र सरकारच्या नागरी कर्मचाऱ्यांना फायदा होईल

एचआरए वाढवण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल, असं कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ बळवंत जैन यांनी सांगितलं. संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार नाही, कारण त्यांच्यासाठी पगारापासून भत्त्यांपर्यंत वेगळी व्यवस्था आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये सुमारे 38 लाख पदं आहेत, त्यापैकी सध्या 31.1 लाख लोक नियुक्त आहेत. त्यामुळे सरकारने एचआरए वाढवल्यास या 31.1 लाख लोकांना त्याचा फायदा होणार आहे. एचआरए वाढविण्याबाबत वेतन आयोगाने शिफारस केली आहे.

एचआरए वाढवण्याचं समीकरण एवढं सोपं नाही. सातव्या वेतन आयोगाच्या ( ) शिफारशीनुसार, एचआरए स्लॅब 30 टक्के, 20 टक्के आणि 10 टक्क्यांऐवजी 24 वरून 8 टक्के करण्यात आला. त्यात दोन टप्प्यांत वाढ करता येईल, असं आयोगाने म्हटलं होतं. प्रथमच, जेव्हा महागाई भत्ता 50 टक्के होईल, तेव्हा 9-27 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये HRA 1 ते 3 टक्क्यांनी वाढवता येईल. यानंतर, जेव्हा महागाई भत्ता 100 टक्के होईल, तेव्हा दुसऱ्या टप्प्यात HRA वाढवता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT