Job esakal
अर्थविश्व

Employment : रोजगाराची सुवर्णसंधी! 'या' कंपनीची भारतात मोठी गुंतवणूक

अमेरिकेबाहेरील पहिल्या क्रमांकाची बाजारपेठ भारतात आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतामध्ये डॉमिनोज पिझ्झा विकणाऱ्या ज्युबिलंट फूडवर्क्स कंपनीने आता 20 मिनिटांत पिझ्झा पोहोचवण्याचा दावा केला आहे. कंपनीने 20 डिसेंबर रोजी आपल्या नवीन सेवेची घोषणा केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही नवी सेवा देशातील 14 शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.

मात्र, कंपनीने अद्याप या शहरांची नावे जाहीर केलेली नाहीत. जुबिलंट फूडवर्क्स ही भारतातील पहिली 30 मिनिटांत पिझ्झा डिलिव्हरी सेवा सुरू करणाऱ्या पहिल्या कंपन्यांपैकी एक आहे. ही नवी सेवा QSR क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

ज्युबिलंट फूडवर्क्सकडे भारत, बांगलादेश, नेपाळ आणि भूतानमध्ये डंकिन आणि पोपिएज रेस्टॉरंट विकसित करण्याचे आणि चालवण्याचे विशेष अधिकार आहेत.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

'या' शहरांमध्ये सेवा सुरू होण्याची अपेक्षा :

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, ज्या शहरांमध्ये वेगवान डिलिव्हरी सेवा सुरू केली जाईल ती देशातील '20 झोन'मध्ये पसरलेली आहेत. या शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि चेन्नई यासारख्या मेट्रो शहरांचा समावेश अपेक्षित आहे. ज्यात मोठ्या संख्येने डॉमिनोजचे स्टोअर आहेत.

डॉमिनोज पिझ्झा जगभरातील 95 बाजारपेठांमध्ये कार्यरत आहे. अमेरिकेबाहेरील पहिल्या क्रमांकाची बाजारपेठ भारतात आहे. त्यानंतर पिझ्झा हटचा क्रमांक लागतो. डॉमिनोजने देशभरात आणखी 1,300 स्टोअर्स उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

पिझ्झा स्टोअरची संख्या 3,000 पर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनीने सध्या 371 शहरांमध्ये 1,701 डोमिनोज स्टोअर चालवते. यातून मोठ्या प्रमाणावर शहरात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ३ महिन्यांच्या मुलीला गटारात फेकून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली आरोपी वडिलांना अटक

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT