अर्थविश्व

मिडकॅप सेगमेंटमध्ये गुंतवणुक करायचीये? तज्ज्ञांनी निवडले 6 दर्जेदार शेअर्स

शिल्पा गुजर

तुम्ही मिडकॅप सेगमेंटमध्ये गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय शोधत असाल, तर आजची लिस्ट तयार आहे. या यादीत असे काही शेअर्स आहेत, ज्यांचे फंडामेंटल्स मजबूत आहेत, पण आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी केलेली नाही, पण पुढे जाऊन चांगले परतावा देण्याची क्षमता त्यांच्यात आहे असा विश्वास शेअर बाजार तज्ज्ञांना वाटत आहे. मिडकॅप विभागात गुंतवणुकीचे एकापेक्षा जास्त पर्याय आहेत. मिडकॅप्स शेअर्स इकॉनॉमिक रिकव्हरी आणि चांगल्या मॅक्रो कंडिशन्समध्ये चांगली कामगिरी करतात. आज या लिस्टमध्ये ACRYSIL Ltd, JK Tyre, ITDC, BSE Ltd, RCF आणि PCBL सारख्या शेअर्सचा समावेश आहे. (A list of 6 quality midcap stocks selected by experts for investment)

- शेअर बाजार तज्ज्ञ संदीप जैन

लॉन्ग टर्म: ऍक्रिसिल लिमिटेड (ACRYSIL Ltd)

संदीप जैन यांनी ऍक्रिसिल लिमिटेडमध्ये (ACRYSIL Ltd) लाँग टर्मसाठी गुंतवणूकीचा सल्ला आहे. या स्टॉकसाठी त्यांनी 950 ते 970 रुपयांचे टारगेट दिले आहे. कंपनी इंटिरिअर इंफ्रास्ट्रक्चर आणि बिल्डिंग मटेरियलमध्ये काम करते. नुकतेच त्यांनी काही मोठ्या कंपन्यांशी टाय-अप केले आहेत.

पोझिशनल: जेके टायर (JK Tyre)

संदीप जैन यांनी जेके टायरमध्ये (JK Tyre) गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी त्यांनी 160 ते 170 रुपयांचे टारगेट निश्चिक केले आहे. ही कंपनीटायर्सच्या उत्पादनातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये मोडते.

शॉर्ट टर्म: आयटीडीसी (ITDC)

संदीप जैन यांनी आयटीडीसीमध्ये (ITDC) शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी 430 ते 450 रुपयांचे टारगेट सेटे केले आहे. गेल्या काही दिवसांत या स्टॉकमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. सध्या गुंतवणुकीसाठी व्हॅल्युएशन उत्तम असल्याचे जैन यांचे म्हणणे आहे. टूरिझम सेक्टरमधील वाढीचा फायदा या शेअर्सना मिळेल असेही ते म्हणाले.

शेअर बाजार तज्ज्ञ मुदित गोयल

लॉन्ग टर्म: बीएसई लि (BSE Ltd)

मुदित गोयल यांनी बीएसई लिमिटेडमध्ये लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी 2300 रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर 1900 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

पोझिशनल: आरसीएफ (RCF)

मुदित गोयल यांनी पोझिशनल पिक म्हणून RCF मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकसाठी त्यांनी 97 रुपयांचे लक्ष्य निश्चित केले आहे. तर 82 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

शॉर्ट टर्म: पीसीबीएल (PCBL)

मुदित गोयल यांनी पीसीबीएलमध्ये (PCBL) शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी 275 ते 280 रुपयांचे टारगेट दिले आहे. तर 242 रुपयांवर स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT